Pedestrian girl women killed in accident police hospital doctor pune sakal
पुणे

Pune Accident : ओतूर येथे पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील महिलेसह पदचारी तरूणी ठार

पिकअप चालक अपघात स्थळावरून फरार

पराग जगताप

ओतूर : जुन्नर गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे पिकअपने दुचाकीसह पदचारी तरुणीला उडवले या अपघातात दुचाकी वरील महिलेसह पदचारी तरूणी ठार झाली असून दुचाकीस्वार ही गंभीर जखमी झाल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

सदर बुधवारी सायकाळी सहा च्या सुमारास नगर कल्याण महामार्गावर कोळमाथा येथील हॉटेल दत्तभेळ समोर झाला असून यात दुचाकीवरील सविता गिताराम तांबे वय.४५ व पायी चाललेली ऋतुजा अशोक डुंबरे वय.१९ ह्या जागीच ठार झाल्या आहे. तर दुचाकीस्वार गीताराम नामदेव तांबे हे गंभीर जखमी झाले आहे.हे सर्व ओतूर ता.जुन्नर येथीलच राहणारे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी सायकाळी सहा वाजे दरम्यान गीताराम तांबे हे पत्नी सविता सह दुचाकीवर ओतूर कडून आळेफाट्या कडे चालले होते.तसेच ऋतुजा डुंबरे ही कॉलेज ग्राऊंड वरून पायी परत घरी येत होती.

त्यावेळी आळेफाट्या बाजूकडून भरधाव वेगाने पिकअप गाडी आली.या पिकअप गाडीने कोळमाथा येथे तांबे यांच्या दुचाकीला व पायी चालत असलेल्या ऋतुजा ला धडक दिली.अपघातात नंतर पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

पिकअप चालक अपघात स्थळावरून फरार झाला.या अपघातात दुचाकीवरील सविता गिताराम तांबे व पायी चाललेली ऋतुजा अशोक डुंबरे ह्या जागीच ठार झाल्या आहे.तर दुचाकीस्वार गीताराम नामदेव तांबे हे गंभीर जखमी झाले.

सदर अपघाताची घटना समजताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर,पोलीस हवालदार महेश पटारे,नरेंद्र गोराने,देवराम धादवड,नामदेव बांबळे,सुरेश गेंगजे,शाम जायभाय,धनराज पालवे यांनी घटनास्थळी जाऊन वाहतुक सुरळीत केली.तसेच अपघात ग्रस्त वाहने ताब्यात घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT