Traffic in Jedhe Chowk 
पुणे

#PuneTraffic उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटरनंतरही पुण्यात पादचाऱ्यांचे हालच

सकाळवृत्तसेवा

पुणे : वाय आकाराचा उड्डाण पूल आणि एका ग्रेड सेपरेटरमुळे जेधे चौकातील (स्वारगेट) वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यास काही प्रमाणात मदत झाली असली, तरी पादचाऱ्यांना मात्र रस्ता ओलांडण्यासाठी होणारा त्रास कमी झालेला नाही. या ठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

स्वारगेट येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेने रस्ते विकास महामंडळाकडून जेधे चौकात इंग्रजी 'वाय' या अक्षराच्या आकाराचा एक उड्डाण पूल बांधला आणि पीएमपीच्या प्रशासकीय इमारत ते सारसबागेच्या दिशेने जाणारा एक ग्रेडसेपरेटरही उभा केला. शहरातून सोलापूर आणि साताऱ्याकडे थेट जाणाऱ्या रस्त्याला या चौकातून प्रारंभ होतो. शिवाजी रस्ता आणि टिळक रस्ता या चौकात येऊन मिळतात. याच चौकात एका बाजूला एसटी स्थानक आणि समोरील बाजूस पीएमपीचे स्थानक आहे. खासगी प्रवासी वाहतुकीच्या वाहनांची वर्दळ या भागात मोठ्या प्रमाणावर असते. वाहनांप्रमाणेच पादचाऱ्यांची संख्याही खूप मोठी असते. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर उभा केला, पण पादचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या सर्वंकष विकास आराखड्यात पादचाऱ्यांकरिता सबवे प्रस्तावित होता. 

मेट्रोपर्यंत वाट पाहा 
स्वारगेट येथे मेट्रोचे स्थानक होणार असल्याने हा सब वे उभारण्याचा प्रस्ताव रद्द केला गेला. उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर येथून वाहतूक सुरू होऊन दोन वर्षे उलटली, तरी पादचाऱ्यांना अद्याप जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागत आहे. 'मेट्रो' या भागात ट्रान्सपोर्ट हब उभारणार असून, या प्रकल्पात पादचाऱ्यांकरिता रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. 

'' या चौकातील वाहनांची संख्या, नियम मोडणारे वाहनचालक, पादचारी वाहतूक नियंत्रण दिवे नाही, अशा विविध कारणांमुळे चौकात रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. टप्प्याटप्प्याने रस्ता ओलांडण्याची वेळ येते. '' 
- प्रशांत जगताप; नागरिक. 

'' महापालिकेने पादचाऱ्यांऐवजी वाहनाच्या वाहतुकीला प्राधान्य दिले आहे. भुयारी मेट्रोचे कारण पुढे करून सबवे रद्द करणाऱ्या प्रशासनाने ग्रेड सेपरेटर का बांधला. शहरांत इतर ठिकाणी पादचारी उड्डाण पूल उभारण्याचा घाट घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना या चौकातील पादचाऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची वाटत नाही का.'' 
- प्रशांत इनामदार; पेडीस्ट्रीयन फर्स्ट या संस्थेचे प्रतिनिधी. 

'' या चौकातील सर्वंकष आराखडा मंजूर झाल्यानंतरच मेट्रोला परवानगी मिळाली होती. पादचाऱ्यांकरिता सब वे उभारला असता, तर मेट्रोच्या कामात त्याची बाधा आली असती. मेट्रोच्या आराखड्यात या चौकातील पादचारी वाहतुकीसाठी व्यवस्था केली गेली आहे. '' 
- श्रीनिवास बोनाला; मुख्य अभियंता - प्रकल्प विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT