पुणे

मुख्यमंत्री खांडू यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश म्हणजे ''खाया है, खाने दिया है और खिलवाया भी है'' : काँग्रेस

CD

खांडूंना अभय देऊन
मोदींचा ढोंगीपणा उघड

कंत्राटांतील भ्रष्टाचारप्रकरणी रमेश यांची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ : कंत्राटांतील भ्रष्टाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले असतानाही अरुणाचल प्रदेशचे भाजपचे विद्यमान  मुख्यमंत्री पेमा खांडू अजूनही पदावर कायम आहेत. ही गोष्ट अतिशय असामान्य आणि  अस्वीकार्य आहे. याचा अर्थ ‘खाया है, खाने दिया है और खिलवाया भी है’चे हे एक उदाहरण असून, यातून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण  ढोंगीपणा दिसून येत असल्याची टीका  आज काँग्रेसने  केली.  
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी २०१५ ते २०२५ दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आपल्या कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या १२७० कोटी रुपयांच्या कंत्राटांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सहा एप्रिल रोजी दिले होते. या निर्देशांमुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला होता.  मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा होता किंवा त्यांना राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. परंतु, मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी यांनी निर्लज्जपणे परिस्थितीचा सामना करण्याचे ठरवले,  अशी पोस्ट  आज काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित फायली उपलब्ध करून देण्यास नकार दिला.  त्यामुळे  राज्य सरकार चौकशीत सहकार्य करत नसल्याची सीबीआयने  तक्रार केल्यामुळे  तीन ऑगस्ट २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले. सीबीआयने अकस्मात दाखवलेल्या या धाडसामुळे गृहमंत्री अमित शहाही चक्रावून गेल्याची चर्चा आहे, राज्य सरकारने सीबीआयला संबंधित कागदपत्रे देण्याऐवजी कागदपत्रांचे प्रचंड मोठे गठ्ठे आणून दिल्याचे निरीक्षण  २४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार आहे, असे या  ट्विटमध्ये  रमेश यांनी म्हटले आहे.शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT