पुणे

अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा — कॉंग्रेसची मागणी

CD

पेमा खांडू यांचा
राजीनामा घ्या

जयराम रमेश यांची पंतप्रधानांकडे मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १९ : ‘‘अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याविरोधात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे केली आहे. असे असतानाही खांडू यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा,’’ अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.
खांडू यांचे पदावर राहणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे सांगून रमेश म्हणाले, ‘‘खांडू यांच्या कुटुंबातील सदस्यांना १२७० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०२५ या काळासाठी देण्यात आलेल्या या कंत्राटामुळे हितसंबंधाचा संघर्ष निर्माण झाला आहे. चौकशीचे निर्देश कनिष्ठ वा उच्च न्यायालयाने दिलेले नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिले आहेत. खांडू यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार आहे. म्हणजे सीबीआयकडून ज्या कागदपत्रांचा तपास व्हायचा आहे, ती कागदपत्रे खांडू यांच्या अखत्यारीत आहेत. खांडू अद्याप पदावर कसे आहेत, याचे आश्चर्य वाटते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घेणे आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Sugarcane Farmers : ‘ऊसदराच्या बाबतीत उत्तर द्या’, ओमराजे, तानाजी सावंतांसह आमदार, खासदारांना थेट इशारा, धाराशिवचे शेतकरी संतप्त

बाइकवर आला, श्वानाला गोळी मारली अन्...; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

10-Minute Walk After Meals: जेवल्यानंतर 10 मिनिटं चालणं का गरजेचं आहे? हृदयरोग तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्व

५ कोटी... प्रेमानंद महाराज यांना भेटायला का जातो? विराट कोहलीने मौन सोडले, म्हणाला, फलहारी महाराजांचा दावा...

Crop Loan : ज्या बँकेत कर्जमाफी, त्याच बँकेतून मिळणार पीककर्ज ;जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देशः विशेष पीक कर्ज शिबिर आयोजित करा

SCROLL FOR NEXT