प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा
अपर जिल्हाधिकारी निऱ्हाळी : जिल्हा सनियंत्रण, दक्षता समिती बैठक
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तसेच पीडितांना शासन नियमानुसार अर्थसहाय्य वेळेत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिले. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिराडकर, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, नागरी हक्क संरक्षण पथकाचे सचिन वसमळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, अधीक्षक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सुधाकर भांगरे, जिल्हा समन्वयक सचिन मोरे, तसेच समितीचे अशासकीय सदस्य अरुण तोरप्पा क्षीरसागर, मोहन बाबासाहेब गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी निऱ्हाळी म्हणाले, पोलिस विभागाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तपासाच्या दृष्टीने तातडीने मार्गी लावावीत. पीडितांना न्याय मिळण्यासाठी प्रकरणांचा पाठपुरावा प्रभावीपणे करावा. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सोनवणे यांनी बैठकीच्या अनुषंगाने माहिती दिली. शहरी व ग्रामीण पोलिस विभागाकडे दाखल झालेली आणि प्रलंबित प्रकरणे, न्यायालयात निर्णयासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे, अत्याचारग्रस्त पीडितांना देण्यात आलेले अर्थसहाय्य, प्राप्त अनुदान याबद्दल चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.