पुणे

बारामतीत टपाल कार्यालयात हयातीच्या दाखल्याची सुविधा

CD

गराडे, ता. १८ : केंद्र व राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी नोव्हेंबरअखेर हयातीचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. यासाठी भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतर्फे ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत बायोमेट्रिकसह आता ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा ओळख पडताळणी) ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या पेन्शनधारकांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत, त्यांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. बारामती, इंदापूर, सासवड, दौंड आणि शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामीण टपाल कार्यालये, उपटपाल कार्यालये आणि बारामती मुख्य डाकघरात ही सेवा उपलब्ध आहे.
केवळ ७० रुपये शुल्कात पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक यांना घरी बोलावून अथवा जवळच्या टपाल कार्यालयामध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने हा दाखला सादर करता येईल. यासाठी आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन टपाल कार्यालयाचे अधीक्षक (बारामती विभाग) केतन शित्रे, शाखा प्रबंधक स्वप्नील सावंत आणि क्लार्क अंजन यांनी केले असल्याची माहिती सासवड उपविभागाचे डाक निरीक्षक योगेश वीर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

Junnar Farmers : शेतीचा वाढता उत्पादन खर्च रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; बनकर फाट्यात कांदा लागवड ७००, पुरुष मजुरी ८०० आणि इतर कामांसाठी ५०० रुपये दर

Instagram वर ब्लू टिकसाठी आता पैसे देण्याची गरज नाही! जाणून घ्या अकाउंट मोफत व्हेरिफाय करण्याची सोपी ट्रिक...

SCROLL FOR NEXT