पुणे

उडत्या तबकड्यांच्या फाइल प्रसिद्ध

CD

न्यूयॉर्क, ता.८ (वृत्तसंस्था) ः गेल्या अनेक दशकांपासून सर्वसामान्यांप्रमाणेच संशोधक आणि अभ्यासक यांच्यादृष्टीने कुतुहलाचा विषय ठरलेल्या उडत्या तबकड्यांबाबत (यूएफओ) अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनने आजपासून काही नवी कागदपत्रे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. या माहितीच्या आधारे जनतेनेच स्वतः निष्कर्ष काढावेत, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
‘‘अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यावर भर दिला आहे. मागील प्रशासनांनी ही माहिती दडपण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रम्प प्रशासनाने जनतेला या माहितीचे स्वतः विश्लेषण करण्याची संधी दिली आहे,’’ असे पेंटागॉनने ‘एक्स’वर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले. या संदर्भातील आणखी कागदपत्रे टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येतील.


शोध मोहिमेत कोण?
व्हाइट हाउस, राष्ट्रीय गुप्तचर विभाग, नासा आणि एफबीआय
....
याबाबत कागदपत्रे प्रसिद्ध
- जॉन एफ. केनेडी
- रॉबर्ट एफ. केनेडी
- मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर)

ट्रम्प यांचे मानले आभार
अमेरिकी संसदेने २०२२ मध्ये ''यूएफओ'' संदर्भातील कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. २०२४ च्या एका अहवालात शेकडो नवीन घटनांची नोंद करण्यात आली होती, मात्र परग्रहावरील तंत्रज्ञानाचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप आढळलेले नाहीत. रिपब्लिकन पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले असून, पारदर्शकतेसाठी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, तज्ज्ञांनी ही कागदपत्रे पाहताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेकदा अशा व्हिडिओंबाबत चुकीचे निष्कर्ष काढले जाण्याची शक्यता असते, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT