pune bed in hospital 
पुणे

VIDEO - पुण्यात हॉस्पिटलमध्ये बेडसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  न्यूमोनियाच्या रुग्णाला शहरातील एकाही रुग्णालयात बेड न मिळाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री वर्दळीच्या टिळक चौकात (अलका टॉकिज चौकात) आंदोलन केल्यावर प्रशासन हलले. त्यानंतर रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास रुग्णावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू झाले. सिहंगड रस्त्यावरील धायरी येथे राहणाऱया 34 वर्षांच्या युवकाला न्यूमोनिया झाला होता. दुपारी दोन वाजल्यापासून रुग्णवाहिकेतून शहरातील विविध रुग्णालयांत ते गेले. परंतु, रात्री आठ वाजेपर्यंत त्यांना कोठेही बेड मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी टिळक चौकातील पोलिस चौकीसमोर रुग्णवाहिका उभी करून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.

पोलिसांनी संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी ठरला. नातेवाईकांनी या प्रकाराबाबत बच्चू कडू यांचे कार्यकर्ते नयन पुजारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही अनेक रुग्णालयांत दूरध्वनी केले. दरम्यान महापालिकेच्या एका अधिकाऱयाने कॉंग्रेसचे कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अनेक अधिकाऱयांना दूरध्वनी केले. त्यानंतर येरवड्यातील महापालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात त्या रुग्णाला बेड उपलब्ध झाला अन तेथे त्याच्यावर रात्री उपचार सुरू झाले. 
 

या घटनेबाबत पुजारी म्हणाले, महापालिकेच्या डॅशबोर्डवर बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची नावे होती. तेथे संपर्क साधल्यावर नकारघंटाच पदरात पडली. अलका टॉकिजजवळील एका रुग्णालयात रुग्णाला नेल्यावर बेड नाही, तुम्ही  तुमचे बघा, असे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे नातेवाईक प्रचंड संतप्त झाले होते. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने कमी होत होती, तरीही रुग्णालये दिरंगाई करीत होते. 

बालगुडे म्हणाले, शहरातील सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड थांबली पाहिजे. केवळ डॅशबोर्ड उपयोगाचा नाही तर, तेथे रुग्णांना प्रवेश मिळाला पाहिजे. महापालिकेने यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण केली पाहिजे. 

दरम्यान, महापौर, महापालिकेतील पदाधिकारी, आयुक्त, आरोग्य प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा आरोप त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सकाळशी बोलताना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT