पुणे

कोथरुड : लसीकरणासाठी रखरखत्या 'उन्हाचा ताप'

कोथरुडमधील सुतार दवाखान्यातील स्थिती

जितेंद्र मैड

कोथरुड : ''लसीकरणासाठी (Vaccination) भर उन्हात उभे राहण्याची वेळ नागरीकांवर आल्याने किमान योग्य नियोजन तरी करावे'' अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली. कोथरुडमधील (Kothrud) सुतार दवाखान्याच्या (Sutar Dara) बाहेर असलेल्या पदपथावर भाजी मंडई (Vegetable Seller असल्याने रस्त्यावर नागरीकांनी रांग(Que) लावली होती. वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने भेलकेनगरपर्यंत रस्त्यावर वाहने लावण्यात आली होती. (people have to wait for vaccination Condition at sutar Hospital in Kothrud)

लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे लोकांची रांग वाढत गेली. उशीर होत गेला तसा उन्हाचा कहर वाढला पण, रांग संपली नाही. दीड तासापेक्षा अधिक वेळ नागरिकांना रांगेत उभे रहावे लागत होते. दुपारी अकरानंतर मंडई बंद झाल्यावर पथारीवाल्यांनी लावलेल्या पत्र्याच्या शेडच्या सावलीचा आधार घेत लोक रांगेत उभे राहीले. अनेक नागरीकांना नोंदणी कशी करायची हे माहीत नव्हते. नोंदणी न करता रांगेत उभे राहिलेल्यांचे प्रमाण जास्त होते.

युवराज मेदगे म्हणाले की, ''सुतारदवाखान्याच्या आतील भागात मोठी जागा आहे. तेथे लसीकरणासाठी व तपासणीसाठी आलेले लोक सामावले जावू शकतात. परंतु दवाखान्याच्या व्यवस्थापनाने योग्य नियोजन न केल्याने लसीकरणासाठीची रांग रस्त्यावर आली. सोशल डिस्टन्सींगचापण फज्जा उडाला आहे. लोक पहाटेपासूनच लसीकरणासाठी रांग लावून उभे होते. आम्हाला थोडा उशीर झाला. त्याची सजा म्हणून आता उन्हात उभे आहोत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT