people question and their problem does not solve by shinde govt supriya sule says politics Sakal
पुणे

Supriya Sule: मुंबईतील बीकेसीमध्ये हिऱ्याचा मोठा व्यवसाय शरद पवार मुख्यमंत्री असताना स्थिरावला पण आज..

सर्वसामान्य जनतेचा महागाई, रोजगार, शेतीसाठी पाणी असे दैनंदिन प्रश्‍नासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नाही.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘मंत्रालयात बसून हजारो कोटी रुपयांच्या कॉट्रॅक्टचे विषय आले की त्यांना अडचणी दिसत नाहीत, पण सर्वसामान्य जनतेचा महागाई, रोजगार, शेतीसाठी पाणी असे दैनंदिन प्रश्‍नासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकाला वेळ नाही. एकेकाळी देशातील सर्वात आघाडीवर असलेले महाराष्ट्र या राजकारणामुळे पिछाडीवर पडले आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्यात दुष्काळ पडत असताना त्याचे काहीच नियोजन नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की नाही. शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचा भाव सात रुपयांनी कमी झाला आहे, पण ग्राहकांच्या दुधाचे भाव कमी झालेले नाहीत. महागाई कमी होत नाही. मराठा आरक्षणावरही सोईस्कर भूमिका घेतली जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रश्‍नावर हे सरकार बोलत नाही.

राहुल गांधी हे लढावू आहेत, त्यांना एखादी नोटीस आली तर घाबरून जातील असे नाही. ते कर्तृत्ववान आहेत. हे नोटीसला उत्तर देतील. भाजप ही कायमचे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. खासदार वंदना चव्हाण,

फौजिया खान या दोघीही अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत. त्या परिवारवादातून नाही तर स्वकर्तुत्वातून पुढे आलेल्या नाहीत. पण त्यांना अपात्र करण्याची नोटीस काढली आहे. या सरकारला प्रामाणिक लोक राजकारणात नकोच आहेत, अशी टीका सुळे यांनी केली.

केंद्राकडून मराठी माणसांचे नुकसान

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन मराठी माणसांचे पक्ष फोडून मराठी माणसांचे दिल्लीतील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीतून महाराष्ट्राचे नुकसान करण्याचे काम सुरु आहे. पुण्यातून फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर गेला.

मुंबईतील हिऱ्याचा मोठा व्यवसाय शरद पवार मुख्यमंत्री असताना बीकेसीमध्ये स्थिरावला होता, पण आज हा व्यवसाय गुजरातला गेला. त्याला थांबविण्याचे प्रयत्नही कोणी केले नाहीत. यामागे दिल्लीतील अदृश्‍य शक्तीचे हात आहेत, अशा शब्दात सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT