nitin Gadkari statement Inauguration of Palkhi Marga January politics pune  sakal
पुणे

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी पुण्यासाठीचे नवे प्लॅन सांगितलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : येणाऱ्या काळात बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर ड्रोन उतरतील आणि त्यातून इथं कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे येतील आणि इथं भाषण देतील, तो दिवस आता दूर नाही, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवा प्लॅन कथन केला. पुण्यात आयोजित डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, "येत्या काळात ड्रोन टेक्नॉलॉजी जास्त सक्षम होणार आहे. आता २०० किलोचा ड्रोन तयार झालेला आहे. हा ड्रोन मीच लॉन्च केला आहे. मी या ड्रोन कंपनीला म्हटलं की, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मिरमध्ये जा. तिथल्या पहाडांवर जी गावं असतील तिथली सफरचंद तुम्ही या ड्रोनच्या माध्यमातून खाली आणा तसंच खालून औषधं आणि महत्वाच्या गोष्टी वरती न्या. त्यानंतर सक्सेसफुली हे तिथं सुरु झालं.

त्यामुळं आता नजिकच्या काळात लवकरच विमानतळावरुन बालगंधर्व रंगमंदीराच्या छतावर ड्रोन उतरेल आणि डायरेक्ट भाषणला लोक इथं येतील, तो दिवस आता दूर नाही. कारण आता ड्रोन टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊन राहिली आहे. येणाऱ्या काळात टेक्नॉलॉजी खूप महत्वाचं काम बजावणार आहे" अशा शब्दांत गडकरींनी ड्रोन टेक्नॉलॉजीचं महत्व कथन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT