पुणे

शहरातील काही उद्याने उघडली पण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : दोन महिन्यानंतर महापालिकेने शहरातील काही निवडक उद्याने नागरिकांसाठी खुली केली. मात्र, 'कोरोना'च्या संसर्गाच्या भीतीने बहुतांश नागरिकांनी पाठ फिरवल्याने उद्यानांमध्ये तुरळक नागरिक दिसत आहेत. जे काही नागरिक उद्यानात येत आहेत ते तोंडाला मास्क लावून, दोघांमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन फिरत आहेत. 

लाॅकडाऊन काळात पुणे महापालिकेने शहरातील सर्व २०४ उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळी व्यायाम, चालणे, योगासने हास्य क्लब यामुळे फुलून गेलेल्या उद्यानांना दोन महिने टाळे लावलेले होते. महापालिकेने लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आणत प्रतिबंधित क्षेत्र सोडून इतर भागातील ३१ उद्याने गुरूवारपासून खुली केली आहेत. पण सोशल डिस्टन्सिंगसाठी महापालिकेने कडक नियमावली तयार केल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्रवेश नाकारला असल्याने याचा परिणाम या उद्यानांमध्ये येणाऱ्यांच्या संख्येवर झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले, 'गुरूवारपासून उद्याने उघडली असली तरी उद्यानांमध्ये नागरिकांची गर्दी नाही. 'कोरोना'चा संसर्ग होऊ नये यासाठी सामूहिक व्यायाम, योगासने, ओपन जीम, हास्यक्लब यावर सध्या बंदी आहे. तसेच ६५ वर्षावरील नागरिक व १० वर्षाच्या आतील मुले उद्यानात येऊ शकत नाहीत, त्यामुळे गर्दी ही कमी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संजय बिहाणी व त्यांची पत्नी संगीता बिहाणी कमला नेहरू उद्यानात सकाळी फिरायला जातात. संजय बिहाणी म्हणाले, 'गेल्या दिवसांपासून कमला नेहरू उद्यानात फिरायला जात आहे. पूर्वीच्या तुलनेत आता गर्दी खुप कमी आहे. जे नागरिक येतात ते मास्क वापरतात व सुरक्षीत अंतर ठेवून फिरत आहेत.'

- सामूहिक व्यायामास बंदी
- नागरिक एकत्र येऊ व देण्याची सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी
- ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना बंदी

- मास्क वापरणे बंधनकारक
- शहरातील २०४ पैकी ३१ उद्याने खुली
- सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५ ते ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT