JEE-Exam 
पुणे

JEE Mains : धक्कादायक निकाल! विद्यार्थ्यांचे गुण वाढले, पण पर्सेंटाईल झाले कमी

ब्रिजमोहन पाटील

पुणे : जानेवारीमध्ये झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत मला 161 गुण मिळाले होते, तर 99.05 पर्सेंटाईल इतके होते. मात्र, सप्टेंबरच्या परीक्षेत गेल्यावेळेच्या तुलनेत 43 गुण वाढून देखील पर्सेंटाईल 98.7 इतके आले आहे. गेले चार पाच महिने मी खूप अभ्यास केला होता, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, अशी कैफियत सोनिया पटवर्धन हिने मांडली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) पर्सेंटाईलसाठी जानेवारीमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेतल्याने हा धक्कादायक निकाल लागला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा निकाल जाहीर करा, अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे. 

कोरोनामुळे लांबलेली जेईई मेन्सची परीक्षा देशभरात 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून 8 लाख 41 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 6 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर जानेवारी 2020 मध्ये नोंदणी केलेल्या 9 लाख 21 हजार विद्यार्थ्यांपैकी 8 लाख 69 हजार जणांनी परीक्षा दिली होती. जानेवारीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्‍के कमी होते.

'एनटीए'ने अनुपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण गृहीत धरत पर्सेंटाईल पद्धतीने निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता जानेवारीच्या विद्यार्थ्यांची संख्या प्रमाण मानून त्यावरूनच पर्सेटाइल काढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे 30 ते 40 गुण वाढून देखील पर्सेंटाईलमध्ये 2 ते 4 टक्‍क्‍यांचा फरक पडला आहे. 

आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, गेल्या चार-पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी खूप चांगला अभ्यास केला असल्याने चांगल्या निकालाची अपेक्षा होती, पण आताचा जेईई मेन्सचा निकाल धक्कादायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना किमान दोन ते चार पर्सेंटाईलचा फटका बसला आहे.

'एनटीए'ने अनुपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण गृहीत धरून निकाल जाहीर करणे अपेक्षित होते, पण त्यांनी जानेवारीच्या संख्येवरच निकाल लावल्याने विद्यार्थ्यांना कमी पर्सेटाइल मिळाले आहेत. देशभरात केवळ 3 टक्के मुलांचेच पर्सेंटाईल वाढले आहेत. त्यामुळे सुधारित निकाल जाहीर करावा यासाठी 'एनटीए' आणि शिक्षण मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. 

''लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केल्याने जानेवारीच्या तुलनेत 30 ते 40 गुण वाढून आले, पण पर्सेंटाईल कमी आले आहेत. पण कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याने त्याचा फटका बसला आहे.'' 
- सुबोध पेठे, भागीदार, एम. प्रकाश इन्स्टिट्यूट 

''जानेवारीच्या परीक्षेत मला 145 गुण आणि 98.07 पर्सेंटाईल होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या परीक्षेत 161 गुण पडून देखील 96.08 पर्सेंटाईल मिळाले आहे. मला 99 पर्सेंटाईल मिळतील, अशी अपेक्षा होती. यात माझे नुकसान झाले आहे.'' 
- ओमकार भोसले, विद्यार्थी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT