Pune : रविवारीही देता येणार पर्मनंट लायसन्सची परीक्षा  sakal
पुणे

Pune : रविवारीही देता येणार पर्मनंट लायसन्सची परीक्षा

नागरिकांना मोबाईल फोनवरूनही शिकाऊ वाहन परवाना काढता येईल

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : पक्के लायसन्स मिळण्यासाठी आता नागरिकांना रविवारीही त्यासाठीची परीक्षा देता येणार आहे. पक्के लायसन्स काढण्यासाठी वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयाने या बाबतचा आदेश दिला आहे.

नागरिकांना मोबाईल फोनवरूनही शिकाऊ वाहन परवाना काढता येईल, अशी सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांत शिकाऊ वाहन परवाना काढण्याऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यांच्यासाठी पक्के लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट लगेच मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार होती. परिवहन आयुक्त ढाकणे यांनी या बाबत दखल घेऊन राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) रविवारीही पक्के लायसन्ससाठीची परीक्षा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार पुण्यात तयारी करण्यात आली असून रविवारीही आता पक्‍क्या लायसन्ससाठी परीक्षा देता येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. पक्के लायसन्स काढण्यासाठी नागरिकांनी www.sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर स्लॉट बुकींग या विभागावर क्लिक करायचे आहे. त्यात ऑप्शन विभागात पक्के लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना अपॉइंटमेंट बुक करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पूर्वी पक्के लायसन्स देण्यासाठीची परीक्षा रविवारी होत नव्हती. पुण्यात सुमारे ३० लाख वाहनांची संख्या आहे. त्यात सुमारे २० लाख दुचाकी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT