Permission to exercise outdoors but these things are remain Closed in pune
Permission to exercise outdoors but these things are remain Closed in pune 
पुणे

Unlock1.0 : घराबाहेर व्यायामाला परवानगी अन बरंच काही; पण 'या' गोष्टी आहेत बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉक डाउन 30 जूनपर्यंत वाढविताना नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी व्यायामाला पहाटे पाच ते सकाळी सात दरम्यान परवानगी दिली आहे. तसेच खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत सुरू राहतील, असेही म्हटले आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 


'केंद्र सरकारने पाचवा लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा शनिवारी केली. त्या पाठोपाठ राज्य सरकारनेही तो वाढविला आहे. तसेच जनजीवन सुरळीत करण्यासाठी काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत. मात्र, धार्मिकस्थळे, हॉटेल्स खुली करण्याबाबत राज्य सरकारने काहीही म्हटलेले नाही. आंतरजिल्हा वाहतुकीलाही परवानगी दिलेली नाही. मात्र, जिल्ह्यातंर्गत वाहतूक करता येईल''असे म्हटले आहे.

शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

- रात्री नऊ ते पहाटे पाच दरम्यान राज्यात सर्वत्र संचारबंदी कायम असेल 
- प्रतिबंधित क्षेत्राची माहिती महापालिका प्रशासन फेरचना करून जाहीर करेल 
- सायकलींग, धावणे, व्यायामाला सार्वजनिक ठिकाणी 3 जूनपासून पहाटे पाच ते सकाळी सात दरम्यान परवानगी 
- प्लंबर, इलेट्रिशन, पेस्ट कंट्रोल यांना परवानगी 
- शासकीय कार्यालये 15 टक्के उपस्थित सुरू करण्यास परवानगी 
- दुकाने (मॉल, व्यापारी संकुले वगळता) उघडण्यास परवानगी, महापालिका त्याचे नियोजन करणार 
- कपड्यांच्या दुकानांतील ट्रायल रूम बंद ठेवण्याचा आदेश 
- रिक्षा, कॅब वाहतुकीस 5 जूनपासून परवानगी, महापालिका त्याचे नियोजन करणार. त्यात चालकासह दोघांनाच परवानगी तर दुचाकीवर एकालाच परवानगी. 
- खासगी कार्यालये 10 टक्के उपस्थितीत 8 जूनपासून सुरू होणार
- जिल्ह्यातंर्गत बस वाहतुकीला 8 जूनपासून परवानगी. परंतु, बसच्या क्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी घेणे बंधनकारक 
- आंतरजिल्हा वाहतुकीबाबत स्वतंत्र निर्णय जाहीर होणार 
- सर्व प्रकारच्या दुकानांना 8 जूनपासून सकाळी 9 ते सायंकाळी पाच दरम्यान खुली ठेवण्यास परवानगी 
- शाळा, महाविद्यालये, जीम, चित्रपटगृहे, बार, सलून, ब्यूटी पार्लर, मॉल बंदचा राहणार. 
- सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी 
- माल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाही 


पुणेकरांना दिलासा! मिळकत कर भरण्याससाठी 'या' तारखेपर्यंंत मिळाली मुदतवाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT