पुणे

प्रेक्षकांनो, लवकरच पाहा मालिकांचे नवे भाग ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - गेले दोन महिने टीव्हीवर मालिकांचे जुने भाग आणि कार्यक्रम पाहून वीट आलाय ना? पण, लवकरच मालिकांचे नवे भाग रसिकांना पाहता येणार आहेत. कारण, चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 

केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण थांबले होते. त्यामुळे रसिकांना मालिकांचे आणि कार्यक्रमांचे जुने भाग पाहावे लागत होते. गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून, चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांना केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सांस्कृतिक कार्य विभागाने या मागणीचा विचार करून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. यानुसार आता निर्मात्यांना निर्मितीपूर्वीची आणि नंतरची कामे सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करता येतील. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सूचना यासाठी लागू राहतील. 

चित्रीकरणासाठी करावा लागणार अर्ज 
चित्रीकरणासाठी निर्मात्यांना मुंबईसाठी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल, असे आदेशात स्पष्ट केले आहे. 

राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. आता जबाबदारी निर्माता आणि संबंधित घटकांची आहे. चित्रीकरणाची कामे करताना एकमेकांमध्ये अंतर राखण्यासह सर्व खबरदारी घेऊन, सरकारच्या नियमांचे पालन करायचे आहे. तसेच, कलाकार आणि अन्य सहकाऱ्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. 
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 
 

तब्बल दोन-अडीच महिन्यांनंतर चित्रीकरण सुरू होत आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. कारण, कोरोनामुळे सर्वांनाच खूप काळजी होती. आता सरकारने परवानगी दिल्यामुळे सर्व नियमांच्या अधीन राहून आम्ही चित्रीकरण करू. तसेच, सर्वांची योग्य ती काळजी घेऊ. 
- केदार वैद्य,  दिग्दर्शक, मालिका- माझ्या नवऱ्याची बायको 
 

कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर मर्यादा आल्या होत्या. लॉकडाउनमुळे मालिकांसह चित्रपटांचे चित्रीकरण बंद होते. त्यामुळे सर्वांनाच सक्तीने विश्रांती घ्यावी लागली. आता चित्रीकरणासाठी परवानगी दिल्यामुळे काम करायच चांगलं वातावरण असेल. 
- सुमेध मुडगलकर,  अभिनेता, राधा-कृष्ण मालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT