पुणे

मिठी मारली अन् घडले...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रस्त्यात थांबले असताना कोणी तरी आले आणि आपल्याला मिठी मारली तर आपण गडबडून जाऊ. अशाच प्रकारे एका भामट्याने रस्त्यात थांबलेल्या व्यक्तीला "काका तुम्ही मला ओळखत नाही का?' असे म्हणत मिठी मारली आणि तेथून लगेच निघून गेला. या काकांनी त्यांचे खिसे तपासले असता खिशातील सोन्याच्या तीन अंगठ्या आणि रोख रक्कम गायब असल्याचे समोर आले. ही घटना शंकरशेठ रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी घडली.

58 वर्षीय व्यक्तीने (रा. गारमळा, धायरी फाटा) यासंदर्भात खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दोन्ही हाताचे अंगठे सोडून इतर आठ बोटांमध्ये अंगठी घालण्याची सवय आहे. शुक्रवारी (ता. 6) ते त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी शंकर शेठ रस्ता येथे आले होते.

कारमधून उतरल्यावर त्यांनी डाव्या हातातील तीन अंगठ्या काढून रूमालात बांधून खिशात ठेवल्या. त्याचवेळी एकजण त्यांच्याजवळ आला. " काय काय?, मला ओळखले नाही का?' असे म्हणत त्यांच्या गळ्याला पडला. त्यांना काही कळायच्या आतच हातचालाखीने खिशातील तीन अंगठ्या व 10 हजार 500 रुपयांची रोख असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा ऐवज काढून घेतला.

त्याचवेळी तेथे आलेल्या एक दुचाकीवर बसून तो पळून गेला. फिर्यादी यांनी त्यांचे खिशे तपासले असता अंगठ्या व पैसे दोन्ही चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. परंतु, अद्याप या भामट्यांचा सुगावा लागलेला नाही. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT