person was beaten by three person due to car parking reason
person was beaten by three person due to car parking reason  
पुणे

कार पार्कींग करण्याच्या कारणावरुन एकास जबर मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कार पार्कींग करण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणामध्ये कारचालकासह तिघांनी दुसऱ्या कारचालकास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याबरोबरच फिर्यादी यांची सोनसाखळी, मोबाईल, कारची चावी असा 72 हजार रुपयांचा मुद्देमाल तिघांनी जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटन बुधवारी रात्री अकरा वाजता वडगाव शेरी येथील ब्रम्हासन सिटीसमोरील रस्त्यावर घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी ज्ञानेश्‍वर वायदंडे (वय 38, रा. रांजणगाव, शिरुर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन कारचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'पाच हजार वर्षात एकाही हिंदू राजाने मशीद पाडली नाही' - गडकरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अनोळखी कारचालक बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील ब्रम्हासन सिटी या इमारतीसमोरील जागेमध्ये कार पार्कींग करीत होते. त्यावेळी पार्कींगवरुन दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी आरोपी कारचालकाने फिर्यादीस तुला महागात पडले, अशा शब्दात धमकी दिली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्याचबरोबर त्याने फिर्यादीच्या कारच्या काचेवर दगड मारुन काच फोडली. या प्रकारामुळे घाबरुन फिर्यादी हे तेथून पळून जाऊ लागले. तेव्हा आरोपी कारचालकासह अन्य तिघांनी फिर्यादीचा पाठलाग करुन त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम व गाडीची चावी असा 72 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT