Lord Krishna sakal
पुणे

भगवान श्रीकृष्णांचे व्यक्तिमत्त्व उलगडणार

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा पुढाकार; वर्षभरात ग्रंथाची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भगवद्‌गीतेच्या अनुषंगाने श्रीकृष्ण चरित्राचा आजवर विपुल अभ्यास झाला आहे. मात्र, भगवद्‌गीतपलीकडे कुशल राजनीतीतज्ज्ञ, उत्तम प्रशासक, चतुर मुत्सद्दी असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत.

हेच पैलू समोर आणण्याच्या उद्देशाने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे ‘गीतेविना श्रीकृष्ण’ हा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत येत्या वर्षभरात ग्रंथाची निर्मिती करण्यात येणार आहे.

प्रकल्पाचा उद्देश काय?

भगवान श्रीकृष्णांचा आजवरचा अभ्यास हा प्रामुख्याने भगवद्‌गीतेला केंद्रस्थानी ठेवून झाला. परंतु, त्यांचे व्यवहार कौशल्य, बुद्धिचातुर्य आदी पैलूंवर पुरेसा प्रकाश पडलेला नाही. त्यादृष्टीने संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशी सूचना मुंबई येथील उद्योजक व श्रीकृष्ण भक्त श्रीकांत पारेख यांनी संस्थेला केली. त्यांनीच या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य दिले आहे.

येत्या वर्षभरात ग्रंथनिर्मिती

या संशोधन प्रकल्पाला एक डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली. एक वर्षाचा कालावधी या प्रकल्पासाठी निश्चित केला आहे. प्रकल्पाच्या अखेरीस यातील संशोधनाचे दस्तावेजीकरण असलेल्या ग्रंथाची निर्मिती करण्यात येईल. संशोधनातील आशयावर आधारित काही दृकश्राव्य पद्धतीचा ऐवज तयार करण्याचाही विचार सुरू आहे, अशी माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली.

महाभारतावर आधारित अभ्यास

संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. त्यांना अभ्यासक प्रतिभा वामन या सहकार्य करत आहेत. ‘‘या संशोधन प्रकल्पासाठी महाभारतातील प्रसंगांचा आधार घेतला जाणार असून गरज भासल्यास भागवत पुराणातील कथांचाही संदर्भ घेतला जाणार आहे. श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्त्वातील वैचारिक अंगाचा यात प्रामुख्याने अभ्यास केला जाईल,’’ असे प्रतिभा वामन यांनी स्पष्ट केले.

महाभारत, भगवद्‌गीता आणि श्रीकृष्ण हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. श्रीकृष्णांवर अभ्यास करून मी यापूर्वी ‘या सम हा’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. या प्रकल्पामुळे भगवद्‌गीते-पलिकडचे श्रीकृष्ण लोकांसमोर येतील. याचा अर्थ प्रकल्पातून भगवद्‌गीता वगळत नसून उलट या अभ्यासामुळे कदाचित गीतेतील तत्त्वज्ञान समजून घेण्यास मदतच होईल.

- डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT