पुणे

तीन एकर केळीच्या बागेवर तणनाशकाचे फवारणी करून अज्ञाताकडून तीन लाखाचे नुकसान

CD

CKL26B03172
चिखलठाण (ता. करमाळा) : येथे किरण डोके या शेतकऱ्याच्या केळी पिकावर तननाशकाची फवरणी केल्याने जळू लागलेली केळीची बाग.

तीन एकर केळीवर तणनाशकाची फवारणी
चिखलठाण येथील शेतकऱ्याचे अज्ञाताकडून तीन लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
चिखलठाण, ता. ३० : चिखलठाण (ता. करमाळा) येथील तीन एकर केळीच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशकाची फवारणी केल्याने शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
कंदर (ता. करमाळा) येथील केळी निर्यातदार शेतकरी किरण डोके यांनी चिखलठाण येथील गट क्रमांक ५२९ मध्ये जुलै महिन्यात तीन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती. लागवडीपूर्वीच्या मशागतीपासून नियमित खत व पाणी व्यवस्थापन सुरू होते. मात्र, शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी अज्ञात व्यक्तीने कपट भावनेतून तीन एकर क्षेत्रावरील केळीच्या पिकावर तणनाशकाची फवारणी केली. त्यामुळे केळीचे पीक जळून गेले असून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान करणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, करमाळा तालुक्यात अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना अशा प्रकारे त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी उमरड, कुगाव, भिवरवाडी येथेही तणनाशकाची फवारणी करून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bhimashankar Route: घोडेगाव-भीमाशंकर रस्ता खड्डेमय, अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सुप्रिया सुळे

SCROLL FOR NEXT