पेठवडगाव जनावरांच्या
बाजारात सात कोटींची उलाढाल
वडगावमध्ये २५ लाखांची खिलार बैलजोडी ठरली आकर्षण
ॲग्रोवन वृत्तसेवा
पेठवडगाव, जि. कोल्हापूर : येथील प्रसिद्ध अंबाबाईच्या लक्ष्मी बाजारात विजयादशमीनंतरच्या पहिल्या सोमवारी (ता. १२) पारंपरिक पद्धतीने भरलेल्या जनावरांच्या बाजारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. जनावरांची मोठी आवक झाली. सात कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली. बावची येथील २५ लाखांची खिलार बैलजोडी आकर्षण ठरली.
यंदा गायी आणि म्हशींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्वाधिक झाले. म्हशींना ४० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत भाव मिळाला. मिणचे येथील अनिल जाधव यांची दररोज २० लिटर दूध देणारी मुऱ्हा म्हैस ईश्वरपूरचे विनायक पाटील यांनी दोन लाख ५१ हजार रुपयांना खरेदी केली. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जाधव यांच्या तीन मुऱ्हा म्हशी सहा लाख १० हजार रुपयांना घेतल्या.
गायींना ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत दर मिळाला. कवठेमहांकाळचे रंगराव भोसले यांची एच. एफ. गाय अंबपचे विक्रम डोंगरे यांनी एक लाख ७५ हजार रुपयांना खरेदी केली. बावची येथील नायकू भोसले यांच्या खिलार बैलजोडीसाठी पुण्याचे अभिजित दगडे-पाटील यांनी १७ लाखांची बोली लावली. मात्र, २१ लाखांची अपेक्षित किंमत न मिळाल्याने सौदा झाला नाही.
सभापती सुरेश पाटील, किरण इंगवले, बाळकृष्ण बोरोडे, सुभाष भापकर, वसंतराव खोत, नागेश नरंदेकर, मनोहर चव्हाण व सचिव सुरेश चव्हाण यांनी बाजाराचे नियोजन सांभाळले. वडगाव बाजार समितीने चारा-पाण्याची व्यवस्था केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.