Petition rejected for reconsideration of remand of the accused in the builder ransom case  
पुणे

बांधकाम व्यावसायिक खंडणी प्रकरणीआरोपींना पुन्हा कोठडी देण्याची पुनर्विचार याचिका फेटाळली

सनील गाडेकर

पुणे : जमीन व दोन कोटी रूपयांच्या  खंडणीसाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणातील आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी देण्याबाबत कोथरूड पोलिसांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. सत्र न्यायाधीश  ए. व्ही. रोट्टे यांना हा आदेश दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी (वय 64, पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन दीप्ती आहेर (वय 34, रा. व्हीला विस्टा अपार्टमेंट, बावधन), माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), बडतर्फ पोलिस शैलेश हरिभाऊ जगताप (वय 49, रा. विश्वकर्मा इमारत, भवानी पेठ), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरुड) आणि पत्रकार देवेंद्र फूलचंद जैन (वय, 52, प्रियदर्शनी सोसायटी, गणेशमळा, सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. जगताप, जैन आणि आहेर यांना या गुन्ह्यात अटक झाली होती. तर बऱ्हाटे आणि चव्हाण फरार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावत आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा पोलिस कोठडी द्यावी, या मागणीसाठी कोथरुड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली. बचाव पक्षातर्फे ऍड. उज्वला पवार आणि विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT