Petopia Pool Party sakal
पुणे

Petopia Pool Party : पाळीव श्वानांसाठी ‘सकाळ’कडून ‘पेटोपिया’ पूल पार्टीचे आयोजन

पाळीव श्वानांसाठी आठ आणि नऊ जून रोजी कर्वेनगर येथील ‘टेल ऑफ द सिटी’ येथे सशुल्क ‘पेटोपिया’ पूल पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पाळीव श्वानांसाठी आठ आणि नऊ जून रोजी कर्वेनगर येथील ‘टेल ऑफ द सिटी’ येथे सशुल्क ‘पेटोपिया’ पूल पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील पाळीव प्राणी, त्यांचे पालक आणि सर्व प्राणीप्रेमींसाठी तीन दिवसीय ‘पेटोपिया गाला’ फेस्टिव्हल येत्या नोव्हेंबर महिन्यात घेतला जाणार आहे. या फेस्टिव्हलनिमित्त पाळीव प्राण्यांसाठी विविध मासिक उपक्रम घेतले जाणार आहेत.

सध्या अनेक लोक विविध जातींच्या देशी-विदेशी श्वानांचा सांभाळ करतात. आपल्या पाळीव श्वानांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून ते प्रयत्नशील असतात. खास प्राणीमित्रांच्या सहकार्याने पाळीव श्वानांच्या मौज - मस्तीसाठी आकर्षक पद्धतीने डिझाईन करण्यात आलेल्या ‘पेटोपिया’ पूल पार्टीत आपल्या श्वानांची नोंदणी करता येईल. या उपक्रमास बार्क आउट लाऊड, विवाल्डीस हेल्थ अँड फूड यांचे साहाय्य लाभले आहे.

‘पेटोपिया’ पूल पार्टीची वैशिष्ट्ये

  • श्वानांसाठी स्वीमिंग पूल (बॅचेसमध्ये)

  • खेळण्यासाठी विविध आकर्षक खेळणी

  • श्वानांसाठी खास प्रकारचे जेवण

  • टेकअवे आकर्षक गिफ्ट

  • श्वानांसह अ‍ॅजिलिटी फन पार्क (बॅचेसमध्ये)

हे लक्षात ठेवा

  • तारीख - ८ व ९ जून

  • वेळ - दुपारी ३ ते ७

  • नोंदणी शुल्क - २९९/- (प्रतिश्वान)

  • प्रायोजकांतर्फे पहिल्या ५० सहभागींना रु. ३५०/- ची शाम्पू बॉटल फ्री मिळणार आहे.

  • अधिक माहितीसाठी संपर्क : ७०३००१२०२१

‘बार्क आउट लाऊड’ आणि ‘विवाल्डीस हेल्थ अँड फूड’ पाळीव प्राण्यांच्या वेलनेससाठी एका दशकापासून कार्यरत आहे. ‘सकाळ पेटोपिया’ पूल पार्टीचा ‘बार्क आउट लाउड’ एक भाग होत आहे. हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आमच्या विशेष ग्रूमिंग उत्पादनांमध्ये डॉग आणि कॅट शाम्पू, कंडिशनर आणि सीरमचा समावेश आहे. ‘सकाळ’ च्या पेटोपिया पूल पार्टीसाठी खूप शुभेच्छा! सगळ्या पेट्ससाठी हा क्षण आनंदाची पर्वणी ठरो, ही अपेक्षा!

- कुणाल खन्ना, सीईओ आणि संस्थापक बार्क आउट लाऊड, विवाल्डीस हेल्थ अँड फूड प्रा. लि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Yavatmal: पीककर्ज वाटपाची गती मंदावली; आतापर्यंत 21 टक्के वाटप; दोन हजार 200 कोटीचे उदिष्ट

Amravati: शासकीय कामासाठी खासगी आयडीचा वापर; चौकशीचा अहवाल एटीसींकडे : गृहपालाच्या अडचणीत वाढ

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT