petrol diesel rates hike pune city district rates 
पुणे

पेट्रोल-डिझेल महागले; जाणून घ्या पुण्यातले दर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : देशभरात 80 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेल वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 60 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. पुण्यातही आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होत आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दरही 40 डॉलर प्रति बॅरलच्या गेल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन दरम्यान, इंधनाची मागणी कमी झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नव्हता.

मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढून 22.98 रूपये प्रति लीटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून 18.83 रूपये प्रति लीटर करण्यात आले होते. उत्पादन शुल्कात वाढ केल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळाला नव्हता. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी अधिभार वाढवल्याने राज्यात इंधनाच्या दरात आधीच वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ झाली होती. आता पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात आणखी वाढ केली आहे.

असे आहे महत्त्वाच्या शहरांमधील दर

  • मुंबई – पेट्रोल 78.91 रूपये आणि डिझेल 69.79 रूपये
  • पुणे - पेट्रोल 78.67 रुपये आणि डिझेल 67.55 रुपये
  • नवी दिल्ली – पेट्रोल 71.86 रूपये आणि डिझेल 69.99 रूपये
  • चेन्नई – पेट्रोल 76.07 रूपये आणि डिझेल 68.74 रूपये
  • हैदराबाद – पेट्रोल 74.61 रूपये आणि डिझेल 68.42 रूपये
  • बंगळुरू – पेट्रोल 74.18 रूपये आणि डिझेल 66.54 रूपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT