Crime sakal
पुणे

Crime News : पेट्रोल भरण्यास उशीर झाल्यामुळे मालकास मारहाण

दुचाकीत पेट्रोल भरण्यास उशीर झाल्यामुळे तिघांनी पेट्रोल पंपाच्या मालकासह कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना मंगला थिएटरजवळ पंपावर घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दुचाकीत पेट्रोल भरण्यास उशीर झाल्यामुळे तिघांनी पेट्रोल पंपाच्या मालकासह कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना मंगला थिएटरजवळ पंपावर घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना चार तासांत ताब्यात घेतले.

या प्रकरणी नवनाथ कचरू काळे (वय २६) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरजितसिंग युवराजसिंग जुनी (वय २४), जयसिंग जलसिंग जुनी (वय १९, दोघे रा. पाटील इस्टेट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महापालिका भवन परिसरातील मंगला थिएटरजवळ पंपावर पेट्रोल भरायला आले होते.

पेट्रोल भरण्यास उशीर झाल्यावरून आरोपी आणि कामगारांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी दोघांनी कामगार नवनाथ काळे यांना मारहाण केली. त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने जुनी आणि त्याचे साथीदार पेट्रोल पंपावर आले. त्यांनी पेट्रोल पंपावरील कार्यालयाची तोडफोड केली. पेट्रोल पंपाचे मालक सचिन शहा यांना बांबूने मारहाण करून जखमी केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त वसंत कुंवर यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, सविता सपकाळे, उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी रूपेश वाघमारे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT