Petrol 
पुणे

पेट्रोलचे दर ९० रुपयांच्या घरात

सनील गाडेकर

पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक चटके सोसत असलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून सुसाट असलेला पेट्रोल दरवाढीचा मीटर नव्वद रुपयांच्या घरात पोचला आहे. शहरात शनिवारी पेट्रोलची किंमत ८९.४४ रुपये झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक जूनपासून लॉकडाउनमध्ये देण्यात आलेल्या काही सवलतीनंतर पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली होती. त्यामुळे तेव्हापासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी राज्य सरकारने अधिभार वाढवला आहे. तसेच सुरुवातीच्या लॉकडाउनमुळे तीन महिने इंधन घेऊन आलेले जहाज समुद्रात थांबून होते. त्याचाही खर्च वाढला होता. तसेच देशात इंधनाची मागणी एकदम वाढली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर जूनमध्ये अचानक वाढले होते. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये दरवाढ काहीशी मंदावली होती. मात्र आता नोव्हेंबर अखेरपासून पुन्हा दरवाढ होत आहे. गेल्या १५ दिवसांत पेट्रोल दीड रुपयांनी महागले आहे. 

तर तीन रुपयांनी किंमत कमी होतील 
राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे मागील सरकारने इंधनावर तीन रुपयांचा दुष्काळ कर लावला होता. आता मात्र राज्यात दुष्काळाची परिस्थिती नाही. त्यामुळे तो कर मागे घेतल्यास इंधनाचे दर तीन रुपयांनी कमी होईल. त्यातून वाहन चालकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.   

जूनमध्ये सर्वाधिक झळ 
दुचाकीसह नियमित चारचाकी वाहनाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला बसणारी चाट जून महिन्यात १८.३५ रुपयांनी वाढली आहे. जूनमध्ये डिझेलच्या किमतीत १०.३६ तर पेट्रोल ७.९९ किमतीत रुपयांनी वाढ झाली होती. कोरोना पूर्वीच्या तुलनेत सध्या ७० टक्के पेट्रोल-डिझेलची दररोज विक्री होत आहे.

थंडी पडत असलेल्या देशात उष्णतेसाठी अनेक साधने वापरली जातात. ती पेट्रोल-डिझेलवर चालणारी असतात. त्यामुळे दरवर्षी या काळात तेथील मागणी वाढल्याने इंधनाचे दर उसळतात. मात्र, पेट्रोल ९० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्‍यता कमी आहे. येत्या चार ते पाच दिवसांत दर स्थिर होतील व थंडी कमी होईल त्यानुसार दरही काहीसे उतरतील.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

दरवाढीची कारणे 
1) युरोपीय देशांकडून वाढलेली इंधनाची मागणी  
2) कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत ५० डॉलरच्या घरात
3) आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची वाढलेले मूल्य  

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

IND vs WI 1st ODI Live: जॉन कॅम्बेल-जस्टीन ग्रीव्ह्स जोडीने इतिहास घडवला; १७ वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्सनी मोठा पराक्रम केला

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Teacher Success Story: जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..; बाबांचे स्वप्न लेकीने उचलले खांद्यावर; ज्योती शेलाराची शिक्षणप्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT