पुणे

औषध विक्रेत्यांच्या आज बंद

CD

औषधविक्रेत्यांचा
आज देशव्यापी बंद

गैरसोय टाळण्यासाठी ‘एफडीए’ अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ऑनलाइन औषधविक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या विरोधात उद्या (ता. २०) देशभरातील औषधविक्रेत्यांनी बंद पुकारला असताना, नागरिकांना औषधांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. बंददरम्यान अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मुंबईत विभागनिहाय नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली आहे.

‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ तसेच ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने या बंदची हाक दिली आहे. ऑनलाइन औषधविक्रीवरील नियंत्रण, कॉर्पोरेट सवलतींना आळा आणि औषधविक्रीतील पारदर्शकता यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, औषधविक्रेत्यांनी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन ‘एफडीए’कडून करण्यात आले होते. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पर्यायी यंत्रणा सक्रिय केली आहे. एफडीएचे सहआयुक्त (औषधे) आणि नियंत्रण प्राधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने, २४ तास सुरू असणारी मेडिकल स्टोअर्स तसेच काही निवडक औषधविक्रेत्यांशी समन्वय साधण्यात आला आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या असून, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांशीही संपर्क ठेवण्यात येत आहे. प्रत्येक विभागात नागरिकांना आवश्यक औषधे उपलब्ध राहावीत, यासाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत औषधपुरवठ्याबाबत अडचण आल्यास नागरिकांनी एफडीए नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धावत्या लोकलमध्ये आसनावरून वाद, नंतर धक्काबुक्की अन्... ६२ वर्षीय प्रवाशाला ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू

J&K High Court Bench: लडाखमध्ये जम्मू-काश्मीर हायकोर्टची बेंच स्थापन होणार! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा

CSMT Ghee Scandal: धक्कादायक! ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे तूप मोटरमनच्या ताटात; सीएसएमटीतील ‘साई कटर्स’ कॅन्टीन बंद

Marwade Bypass : मरवडे बायपास मागणी आंदोलनात वाहतूक अडथळा; 35 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, सनदशीर आंदोलनाला शिक्षा?

Latest Marathi News Live Update: बालवडकरांनंतर टिंगरेंचाही निधी घेतला काढून, स्थायी समितीत भाजपाच निर्णय

SCROLL FOR NEXT