Savitribai Phule Pune University esakal
पुणे

Phd Admission : विद्यापीठाकडून ‘पेट’द्वारे पीएचडीची शेवटची संधी

तुम्ही जर सेट किंवा नेट पात्र नसाल आणि पीएचडीसाठी प्रवेश घेऊ इच्छिता. तर तुमच्यासाठी यंदाची पीएचडी प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘पेट’ शेवटची संधी असणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तुम्ही जर सेट किंवा नेट पात्र नसाल आणि पीएचडीसाठी प्रवेश घेऊ इच्छिता. तर तुमच्यासाठी यंदाची पीएचडी प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘पेट’ शेवटची संधी असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पेटची घोषणा करण्यात आली असून, अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. २४ ऑगस्ट रोजी पेट परीक्षा पार पडणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मार्फत ‘पीएचडी’चे प्रवेश ‘नेट’च्या गुणांआधारे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ऐनवेळी झालेला निर्णय आणि विद्यापीठाची पेटची तयारी पाहता, शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी पीएचडीचे प्रवेश पेटच्या माध्यमातून घ्यायचे का नाही, या संदर्भात विद्यापीठाने यूजीसीकडून मार्गदर्शन मागविले होते.

दरम्यान सेट-नेट उत्तीर्ण नसलेले मात्र पीएचडीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यूजीसीच्या निर्णयानंतर हवालदील झाले होते. त्यामुळे विद्यापीठाने शेवटची का होईना ‘पेट’ परीक्षा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली. अखेरीस विद्यापीठाने पीएचडी प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे.

अर्जासाठी महिनाभराची मुदत

बुधवार (ता. १०)पासून पेटसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. एकूण १०० गुणांच्या या परीक्षेत ५० गुण हे संशोधन पद्धती आणि ५० गुण हे संबंधित विषयासाठी असणार आहे. बहुपर्यायी स्वरूपाच्या या परीक्षेत चुकीच्या उत्तराला कोणतेच गुण कमी होणार नाही.

मुलाखतीनंतर प्रवेश निश्चिती

नेट आणि सेट उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पेटची परीक्षा द्यायची नाही. मात्र, त्यांनी पीएचडी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष प्रवेशासाठी ७० टक्के गुण हे प्रवेश परीक्षेचे गृहीत धरले जातील तर ३० टक्के गुणदान हे मुलाखतीनंतर केले जाईल. त्यानंतरच प्रवेश निश्चिती होणार आहे.

हे लक्षात ठेवा...

  • अहमदनगर, पुणे आणि नाशिक येथील केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा

  • परीक्षेचा कालावधी - ९० मिनिटे

  • उत्तीर्ण होण्यासाठी - ५० गुण (खुला प्रवर्ग), ४५ गुण (राखीव प्रवर्ग)

महत्त्वाच्या तारखा -

  • ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत - १० ऑगस्ट

  • परीक्षेची तारीख - २४ ऑगस्ट

  • पेटच्या निकालाची संभाव्य तारीख - ५ सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT