पुणे

पीएच. डी, नेट, सेटधारकांना नोकरीच्या संधी

मिनाक्षी गुरव

पुणे : तुम्ही पीएच.डी धारक आहात का किंवा तुम्ही नेट, सेट धारक आहात आणि नोकरीच्या शोधात आहात का? मग तुमचा हा शोध लवकरच संपणार आहे. कारण आता खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पीएच.डी, नेट, सेटधारक विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘जॉब पोर्टल’ तयार केले आहे. याद्वारे देशभरातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना नोकरी मिळविणे शक्य होणार आहे.

या अंतर्गत विद्यापीठात अनुदान आयोगाने खास पीएच.डी., राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (सेट) धारकांसाठी पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना आपले प्रोफाइल तयार केल्यानंतर उमेदवारांना विविध कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये रिक्त जागांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नेट, सेट धारक आणि नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार या पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजाबाबत नोकऱ्या असणार आहेत. याद्वारे लेखापाल, आरोग्य, अभ्यासिका अशा विभागात नोकरी मिळणे शक्य होणार आहे. याची माहिती जॉब पोर्टलवर अपलोड केली जाईल. याबाबत अधिक माहिती ‘www.ugc.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अशा आहेत सुविधा

- या पोर्टलवर पात्र उमेदवार कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकविण्यासाठी नोंदणी करू शकतात

- यासाठी त्यांना आपले प्रोफाइल बनवावे लागणार आहे

- यानंतर संबंधित नोकरी ते पोर्टलद्वारे शोधू शकतील

- पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार नोकरी उपलब्ध असलेल्या शिक्षण संस्थांची माहिती मिळवू शकणार आहेत. तसेच

- संधी असेल तिथे विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे

- नव्या जॉबसोबत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नोकरींच्या उपलब्ध असणाऱ्या संधींबद्दल देखील माहिती दिली जाणार

याबाबतची माहिती लवकरच जॉब पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. देशभरातील विविध विद्यापीठांत उपलब्ध असणाऱ्या संबंधित रिक्त जागांची माहिती लवकरात लवकर आयोगाला कळवावी.

- प्रा. रजनीश जैन, सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT