पुणे

पीएचडी, उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती 

सकाळवृत्तसेवा

पुणे - दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या "सकाळ इंडिया फाउंडेशन'च्या वार्षिक शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. फाउंडेशनतर्फे पंचावन्न भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 60 हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. 

देशाबाहेरील विद्यापीठ वा संशोधन संस्थेकडून 2017-18 या शैक्षणिक वर्षात किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळालेले पदवीधर, भारतीय विद्यार्थी किंवा जुलै 2015 अथवा त्यापूर्वी भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये पीएचडीसाठी संशोधन करण्यासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. या बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीच्या रकमेची परतफेड दोन वर्षांत करावयाची असते. 

वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल. 

अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश दिल्याबद्दलच्या पत्राची छायांकित प्रत व स्वतःचा पत्ता लिहिलेल्या 11 सें.मी. बाय 24 सें.मी. आकाराच्या पाकिटावर 10 रुपयांचे टपाल तिकीट लावून ते "कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे- 411 002' या पत्यावर पाठवावे. विनंतीपत्र पाठविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जाचा नमुना इतर जोडपत्रांसह 31 मेपर्यंत पाठविला जाईल किंवा "सकाळ'च्या 595, बुधवार पेठ, पुणे येथील कार्यालयात सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत प्रत्यक्षात देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे संपूर्ण भरलेले अर्ज 15 जूनपर्यंत "सकाळ'च्या पुणे कार्यालयात स्वीकारले जातील. 

अधिक माहितीसाठी संपर्क - (020) 24405894/95/97. ई-मेल : sakalindiafoundation@esakal.com. 

पात्र विद्यार्थ्यांना अर्जाचा छापील नमुना देण्याची अंतिम तारीख - 31 मे 
संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 15 जून 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT