Photo viral Durga Mavshi  Wish fulfilled by API B A Nanvare
Photo viral Durga Mavshi Wish fulfilled by API B A Nanvare  
पुणे

स्वछता करणाऱ्या दुर्गा मावशींची इच्छा केली पूर्ण; API सोबतचा फोटो व्हायरल

सकाळवृत्तसेवा

पुणे :  नुकताच प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी झेंडा हातात घेऊन विक्री करणाऱ्यांचे हटके फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यावेळीही असाच काहीसा फोटो व्हायरल झाला. हा फोटो आहे येरवडा पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करणारी महिलेचा. सहाय्यक  पोलिस निरिक्षक बी. ए. ननवरे यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी भावूक पोस्ट लिहली आहे. त्यांच्या फोटोला नेटकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.  फेसबूक, व्हॉटस् अॅपवर ही पोस्ट फोटो सह रिशेअर होत आहे.

''येरवडा पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करणारी, दिवसभर पोलीस ठाण्यातील झाडांखाली बसून कामातून मिळेल त्या पैशातून बिस्कीट पूडा किंवा वडा पाव विकत घेऊन त्यातील काही भाग खाऊन काही भाग कुत्रा, पक्षी व खारुताई (जिच्या जवळ पक्षी-खारुताई सहज येऊन तिच्या हातात खाद्य पदार्थ खातात) यांना चारणारी, माझी पोलीस ठाण्याच्या DB पथकात पथक प्रमुख नेमणूक झाली. तेंव्हा सुरुवातीला मला घाबरायची परंतु काही दिवसातच ती दिवसातून 2-3 वेळा जेवण केलं का? म्हणून आस्थेने चौकशी करणारी, माझ्या गैरहजेरीत माझ्याविषयी स्टाफला साहेब कुठे आहे? अशी विचारणा करणारी
 व माझी चौकीला बदली झाल्यावर माझ्यापेक्षा जास्त नाराज झालेली
 दुर्गा मावशी
.

आज तिने माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी विनंती केली. त्यामुळे खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण एका फोटो मुळे तिच्या चेहऱ्यावर समाधानाच स्मितहास्य होतं ते मी या आजच्या दिनाच्या निमित्ताने देवु शकलो.

-Api B.A. NANAWARE

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT