पुणे

खगोलशास्त्रातील पितामहाचा ‘नोबेल’ गौरव

सम्राट कदम

पुणे - ‘‘खगोलशास्त्र म्हणजे भाकितांचे शास्त्र समजले जायचे. केवळ सैद्धांतिक माहितीच्या आधारावर यातील संशोधन होत असते. परंतु, जेम्स पीबल यांनी प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर सैद्धांतिक माहितीला पुष्टी दिली. त्यातून विश्‍वोत्पत्तीची माहिती मिळाली. भौतिकशास्त्रातील ‘नोबेल’च्या रूपाने खगोलशास्त्राचा पितामह पीबल यांचा गौरव झाला आहे,’’ असे गौरवोद्‌गार आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रातील (आयुका) खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी काढले.

भौतिकशास्त्रातील ‘नोबेल’ पुरस्कार यंदा तीन खगोलशास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. मोरे बोलत होते. जेम्स पीबल यांना ‘विश्वाची उत्क्रांती आणि पृथ्वीच्या स्थानाबद्दल केलेले संशोधन’ आणि मिशेल मेयर व डिडिएर क्वेलोज या दोघांना ‘पृथ्वीसदृश ग्रहाच्या शोधा’साठी ‘नोबेल’ जाहीर करण्यात आले आहे. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘वैश्‍विक सूक्ष्मलहरी (कॉस्मिक मायक्रोवेव्ह), डार्क मॅटर, विश्‍वाची उत्पत्ती, ग्रह, ताऱ्यांची निर्मिती यासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन पीबल यांची देणगी आहे. आकाशगंगा, आकाशगंगा समूह (क्‍लस्टर), कृष्णविवरे यांच्याशी निगडित संशोधनाची इमारत पीबल यांच्या संशोधनाच्या भक्कम पायावर उभी राहिली आहे.’’

आपल्या सारखी पृथ्वी विश्‍वात कुठेतरी असेल, असे आपण म्हणत होतो. पण, प्रत्यक्षात तशी निरीक्षणे मिळविण्याचे काम मिशेल आणि डिडिएर यांनी केले आहे. याबाबत डॉ. मोरे म्हणाले, ‘‘आपल्या शरीरात असलेली कार्बन, ऑक्‍सिजन, हायड्रोजन ही मूलद्रव्ये विश्‍वनिर्मितीच्या वेळी निर्माण झाली आहे. त्या वेळच्या ताऱ्यांमधूनच ही मूलद्रव्ये आपल्यात आली असून, त्यातूनच आपण बनलो. एक प्रकारे हे संशोधन आपले विश्‍वाशी नाते सांगते.’’

कसा शोधला पृथ्वीसदृश ग्रह...
आपली सूर्यमाला आणि सूर्य गुरुत्वीय मध्याभोवती फिरतो. त्याचप्रमाणे इतरही सूर्यमाला त्याच्या मध्याभोवती फिरतात. गुरुत्वीय मध्यापासून त्या सूर्याचे अंतर सूर्यमालेत असलेल्या ग्रहांची संख्या दर्शवितो. यावरील निरीक्षणावरून पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध घेण्यात आल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway villages list : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या गावांची यादी आली समोर, कोल्हापूर ७३ तर सांगली जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश

France Gold: फ्रान्सची ‘गोल्ड गेम’ स्ट्रॅटेजी! अमेरिकेत ठेवलेल्या सोन्यातून कमावले तब्बल 1.37 लाख कोटी; काय होता प्लॅन?

झी मराठीच्या मालिकांची वेळ बदलली! 'लक्ष्मीनिवास' आणि सावळ्याची जणू सावली' आता दुपारी दिसणार; पण किती वाजता?

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न; मद्यधुंद चालक अटकेत

सुरकुत्या,पिंपल्स, निस्तेज त्वचा? ‘हे’ 5 सुपरफूड्स वाढवतील कोलेजन अन् देतील ग्लो!

SCROLL FOR NEXT