पुणे

‘स्कायवॉक’ आयटीपर्यंत

सकाळवृत्तसेवा

पुणे - वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्या मार्गिकेचे ‘स्कायवॉक’ हिंजवडी येथील आयटी कंपन्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत बनविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

‘महामेट्रो’च्या ‘पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी’ या दोन मेट्रो मार्गिकेसह ‘पीएमआरडीए’च्या ‘शिवाजीनगर ते हिंजवडी’ या मार्गिकेचे कामदेखील होणार आहे. बालेवाडी येथील ५० एकर जागेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ‘स्मार्टसिटी’ आणि पीएमआरडीएच्या वतीने बालेवाडी आणि विद्यापीठ चौक येथे मेट्रो, बीआरटी आणि पीएमपी बससेवांचे ‘मल्टीनोडल हब’ बनविण्यात येणार आहेत. तसेच शिवाजीनगर येथील शासकीय गोदामाची २५ एकर जागादेखील ‘महामेट्रो’साठी हस्तांतरित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘‘शिवाजीनगर ते हिंजवडी या सुमारे २३ किलोमीटर मार्गिकेमध्ये १४ ते १५ स्टेशन आहेत. प्रत्येक स्टेशनला सायकल स्टॅंड, दुचाकी-चारचाकी पार्किंगची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. तसेच आयटी कंपन्यांकडून मेट्रो स्टेशनला जोडणारे ‘स्कायवॉक’ थेट कंपन्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बनविण्याबाबतचे प्रस्ताव पीएमआरडीएकडे आले होते. त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या कमी होऊन मेट्रोतून प्रवास करण्याचा कल वाढेल,’’ अशी अपेक्षा गित्ते यांनी व्यक्त केली.

पीएमआरडीएच्या अतिरिक्त मनुष्यबळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पीएमआरडीएला तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी मिळणार आहे. प्रधिकरणाला सध्या कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे.
- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिकनिक अभिनेत्रीच्या जीवावर बेतली ! कुटूंबासहित हत्या करून फार्महाऊसवर गाडलं; 13 वर्षांनी मिळाला न्याय

FAFO Parenting: फार झाले मुलांचे लाड! आता व्हा FAFO आई-वडील; जेन अल्फा पॅरेंटिंगमधील नवा ट्रेंड व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

प्राजक्ता माळीने बनवला कोकणातल्या घराघरात बनणारा खास पदार्थ; व्हिडिओ पाहून अमृता खानविलकर म्हणते-

Islamabad Blast: मोठी बातमी! इस्लामाबादमध्ये नमाज दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट; ५० हून अधिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT