PIFF sakal
पुणे

PIFF : पुणे चित्रपट महोत्सवात ५१ देशांतील १४० कलाकृती; संचालक डॉ. जब्बार पटेल यांची माहिती

‘चित्रपट एक आशा’ (सिनेमा इज अ होप) असे यंदाच्या महोत्सवाचे सूत्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजीनगर : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ ते २५ जानेवारी दरम्यान होईल. यात ५१ देशांमधील सुमारे १४० पेक्षा जास्त चित्रपट दाखविले जातील, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चित्रपट एक आशा’ (सिनेमा इज अ होप) असे यंदाच्या महोत्सवाचे सूत्र आहे. या वेळी तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जातील.

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएन्ड मॉलमधील सिनेपोलीस (२ स्क्रीन) येथे चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता यंदा आणखी दोन स्क्रीन उपलब्ध करण्यात आले.

शुक्रवारी (ता. २३) महोत्सवाच्या www.piffindia.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. चित्रपटगृहांमध्ये जागेवर नोंदणीची प्रक्रिया पाच जानेवारीपासून सुरू होईल.

यंदा ६८ देशांतून ११८६ चित्रपटांच्या प्रवेशिका संयोजकांकडे आल्या होत्या. या वेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी उपस्थित होते.

गाजलेल्या चित्रपटांची रसिकांना पर्वणी

गाजलेले अनेक चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. काही चित्रपटांची नावे ः अ सेन्सेटीव्ह पर्सन, ब्लागाज लेसन्स, सिटीझन सेंट, फ्लाय ऑन, हिअर, ओशन आर द रिअल कॉन्टिनेंटस्, पुआन, शल्मासेल, टेरिस्टेरीयल व्हर्सेस, द बर्डन्ड, द ड्रीमर, द सेन्टेन्स, टोल, टुमारो इज अ लाँग टाइम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT