PIFF temporarily postponed to March 18 to 25 Online corona 
पुणे

PIFF तात्पुरते स्थगित; १८ ते २५ मार्च दरम्यान होणार ऑनलाईन

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेत पुणे फिल्म फाउंडेशनने ११ ते १८ मार्च दरम्यान होणारा १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारख्या येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या १८ ते २५ मार्च दरम्यान होईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविली आहे.

याविषयी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहात येण्याविषयी प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांनी आपली चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सावासाठी केलेली नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या महोत्सावासाठी बदलून मिळू शकते का? अशी विचारणा आमच्याकडे केली. आयोजक म्हणून जास्तीत जास्त चित्रपट रसिकांपर्यंत महोत्सव पोहोचावा अशी आमची प्रामाणिक इच्छा असते, मात्र सध्याच्या परिस्थितीत हेच उद्दिष्ट साध्य होईल कि नाही याविषयी शंका असल्याने महोत्सव काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.मात्र, असे असले तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे येत्या १८ ते २५ मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने महोत्सव होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये ज्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने महोत्सवात सहभागी व्हायचे आहे, त्यांना देखील त्यासाठीची आवश्यक ती नोंदणी 'पिफ'च्या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच याआधी चित्रपटगृहात होणा-या महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने होणा-या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल तर तो बदल देखील करून घेणे शक्य होईल. ज्यांनी या आधीच ऑनलाईन पद्धतीच्या महोत्सवासाठी नोंदणी केली आहे त्यांना कोणतीही नवीन प्रक्रिया करण्याची गरज नाही. दि. १८ ते २५ मार्च दरम्यान केवळ जागतिक चित्रपट विभागातील निवडक २६ चित्रपट ऑनलाईन भरविण्यात येणाऱ्या महोत्सवात दाखविण्यात येणार असल्याची नोंद रसिकांनी घ्यावी, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.''
 

महोत्सवाची ऑनलाईन नोंदणी ही www.piffindia.com या संकेतस्थळावर करता येणे शक्य आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT