pik vima  sakal
पुणे

Pik Vima : पंतप्रधान पीक विम्याचे; अर्ज करण्यास सुरवात कृषी विभागाकडून ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित

कर्जदार शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रब्बी हंगामातील पिकांसाठी पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. यानुसार या पीक विमा योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक असलेले आॅनलाइन पोर्टल कृषी विभागाने शुक्रवारपासून (ता.३) कार्यान्वित केले आहे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

या विमा योजनेचा लाभ कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही वर्गातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यानुसार इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत, गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांसाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत तर, उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या दोन पिकांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. राज्य सरकारने यंदाच्या रब्बी हंगामापासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता विमा हप्त्याची शेतकरी हिश्‍श्‍याची रक्कम राज्य सरकार भरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांचा विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. शिवाय या योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर, दिलेल्या मुदतीत बँकेस लेखी कळविणे आवश्यक असल्याचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी सांगितले. पुणे, हिंगोली, अकोला, धुळे व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी, सातारा, नगर, नाशिक,चंद्रपूर,सोलापूर, जळगाव, जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.

‘जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा’ या विमा योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी सामुदायिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रत्येक अर्जासाठी प्रत्येकी ४० रुपये देण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ १ रुपया भरून या योजनेची नोंदणी करणे आवश्‍यक आहे. एक रुपयांपेक्षा अधिक पैशांची मागणी केल्यास, शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, जवळची बँक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT