katebaras 
पुणे

गुळुंच्यातील काटेबारस यात्रेत थरार

श्रद्धा जोशी

गुळुंचे (पुणे) : भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या गुळुंचे (ता. पुरंदर) येथील गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेली ज्योतिर्लिंग देवाची काटेबारस यात्रा शनिवारी उत्साहात संपन्न झाली. गुलालाची उधळण करीत पारंपरिक वाद्ये वाजवत "हर भोले...हर हर महादेव'च्या गजरात अनेक भाविकांनी काटेमोडवन केले. 

वीरता, शौर्य व चित्तथरारक वातावरणात यात्रा मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. यात्रा पाहण्यासाठी लहान मुलांसह हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवनाम, कीर्तन, भजन, काकड आरती, महाभिषेक, प्रवचन, वीणावादन, अभिषेक, बारा दिवसांचे उपवास, छबिना यांमुळे गावात गेल्या पंधरा दिवसांपासून भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

यात्रेचे मुख्य आकर्षण पाहण्यासाठी पाहुणे मंडळी, तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसह राज्यातील अनेक ठिकाणांच्या भाविकांनी हजेरी लावली होती. मंदिरानजीक यात्रेसाठी बांधण्यात आलेल्या स्टेडियमवर तसेच जवळच्या घरांच्या छतावर भाविकांनी यात्रा पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

शुक्रवारी (ता. 8) नीरा स्नानानंतर यात्रेच्या पूर्वरात्री पालखीची सवाद्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. शनिवारी पहाटेपासून दंडवत घालण्यास सुरुवात झाली. शेकडो भाविकांनी गार पाण्याने अंघोळी करून "देवाची काठी' ते मंदिरापर्यंत उघड्या अंगाने दंडवत घातले. सकाळी गावातील व परिसरातील बारा वाड्यावस्त्यांवरून देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी काठी मंदिरात आल्यावर काठीच्या प्रदक्षिणा झाल्या. काट्यांभोवती उत्सवमूर्ती ज्योतिर्लिंग तसेच जोतिबाच्या पालखीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण होताच हर भोले...च्या जयघोषात काटेमोडवनास सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत काटेमोडवन सुरू होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT