पुणे

पिलीव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी गड राखणार की भाजपचे कमळ फुलणार - गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व भाजपात चुरस

CD

लोगो : पिलीव जि.प. गट
---
राष्ट्रवादी (शप) गड राखणार,
की भाजपचे ‘कमळ’ फुलणार?
पिलीव, तांदूळवाडी गणात बहुरंगी लढत
अतुल नष्टे : सकाळ वृत्तसेवा
पिलीव, ता. २३ : माळशिरस तालुक्यातील पिलीव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य लढत होणार आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गड राखणार, की भाजपचे ‘कमळ’ फुलणार? याकडे लक्ष लागले आहे. या गटात चुरशीची लढत होणार आहे.
या गटात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी मोहिते- पाटील व जानकर गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून या गटात उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या मागे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांची तर भाजप उमेदवारांच्या मागे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांची ताकद आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी प्रवेश केला आहे. पिलीव जिल्हा परिषद गटात दुष्काळी भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न, वाड्या- वस्त्यांवरील रस्त्याचे प्रश्न, ग्रामीण रुग्णालयाची मागणी आदी विविध समस्या आहेत. पिलीव पंचायत समिती गणात १९ हजार ९६४ तर तांदूळवाडी पंचायत समिती गणात १७ हजार २८१ असे एकूण पिलीव जिल्हा परिषद गटात ३७ हजार २४५ मतदार आहेत. गटात एकूण ३९ बूथ आहेत.
पिलीव जि.प. गटातून चंद्रकांत जाधव (भाजप), रणजितसिंह जाधव (राष्ट्रवादी श.प.), पृथ्वीराज पाटील (काँग्रेस),धनाजी जाधव (महाराष्ट्र विकास सेना पक्ष) तर ज्योतिराम कदम, संग्रामसिंह जहागीरदार, गणेश पाटील, दादा मुंजे, संतोष सदेवाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पिलीव गणातून जयश्री कदम (काँग्रेस), यज्ञसेना जहागीरदार (राष्ट्रवादी श.प), नम्रता पुकळे (भाजप) तर रेश्मा दुपडे, साधना पडळकर, सविता पुकळे, वर्षा मदने, दीपाली मोहिते, रेणुका शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
तांदूळवाडी गणातून वैशाली फुलारे (भाजप), मनीषा पाटील (राष्ट्रवादी श.प.), जयश्री कदम (काँग्रेस), मीनाक्षी जाधव, राजश्री ढेंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
---
पिलीव गटातील गावे
- पिलीव गण : पिलीव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव.
- तांदूळवाडी गण : तांदूळवाडी, मळोली, फळवणी, साळमुखवाडी, काळमवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT