PDCC Bank Theft sakal
पुणे

Crime News : पिंपळवंडी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी सोसायटी मध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न

पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व विविध कार्यकारी सोसायटीत सोमवारी (ता. १५) मध्यरात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी - पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व विविध कार्यकारी सोसायटीत सोमवारी (ता. १५) मध्यरात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती बँकेचे शाखा अधिकारी इंद्रजित चंडालिया यांनी दिली.

चंडालीया यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पिंपळवंडी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करत असलेले अमोल भागवत यांनी त्यांना फोन करून कळविले की, सोसायटीच्या कार्यालयातील खिडकीचे गज कापलेले असून शटरचा आतील दरवाजा लावलेला आहे. सकाळी मी पिंपळवंडी येथे येऊन सोसायटीचे चेअरमन रघुनाथ लेंडे यांना सदर माहिती कळवली असता त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला सदर घटना कळवली.

आळेफाटा पेालीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी गज कापलेल्या खिडकीतून आत जाऊन शटरचा दरवाजा उघडला. विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयाची पहाणी केली असता सोसायटीचा पुढील दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनात आले.

चोरट्यांनी तेथील कपाटांचे दरवाजे उघडुन त्यातील कागदपत्र अस्ताव्यस्त टाकलेली होती. तसेच पहिल्या मजल्यावर असलेल्या बँकेची पाहणी केली असता बँकेच्या ग्रिलच्या दरवाजाचे कुलुप तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसले, ते कुलुप तोडता न आल्याने चोरट्यांना आत मध्ये प्रवेश करता आला नाही. सुरक्षारक्षक हे तेथील धान्य दुकानाजवळ बसले असता त्यांना कोणताही आवाज आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सोसायटीच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या शेतातून चोरट्यांनी बांबुची शिडी बनवुन प्रथमतः स्वच्छता गृहाच्या खिडकीचे ग्रील कापले त्यातुन आतमध्ये प्रवेश करता न आल्याने त्यांनी कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील कापुन आत प्रवेश केला.

सदर घटनेची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दिलेली असुन पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पर्वती येथील शाहू वसाहत एसआरए प्रकल्पावरील सुनावणी आज; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बारामतीत कारची वारकऱ्याला धडक, अपघातात वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू

Nagpur Tiger Census: आनंदाची बातमी! नागपूरच्या जंगलात वाघांची डरकाळी; पहिल्याच अधिकृत गणनेत 42 ते 45 वाघांची नोंद

SCROLL FOR NEXT