पुणे

बांधकाम परवाना विभाग अधिकाऱ्यांची चौकशी करा

CD

पिंपरी, ता. ८ : ‘‘पिंपरी चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. सहशहर आणि कार्यकारी अभियंता पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी पैसे मागत आहेत,’’ अशी तक्रार भाजपच्या एका नगरसेवकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावर ‘‘या प्रकरणाची चौकशी करावी,’’ असे आदेश फडणवीस यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहेत.
सहशहर अभियंता सुनील भागवानी आणि कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांच्यावर नगरसेवक तुषार हिंगे यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. ‘‘त्यांच्याकडून बांधकाम परवानगीसाठी फायलींमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक त्रुटी काढून मंजुरी लांबविली जाते. त्यानंतर फायली पुढे नेण्यासाठी चौरस फुटानुसार आर्थिक मागणी केली जाते. पैसे न दिल्यास मंजुरीची प्रक्रिया रेंगाळत ठेवली जाते. विकास प्रकल्पांतील मूळ नकाशे, रस्ते किंवा मंजूर आरक्षणांचा मुद्दा पुढे करून बांधकाम व्यावसायिकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचाही आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून त्यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत सहशहर अभियंता भागवानी यांनी, ‘‘मला या विषयी काही माहिती नाही’’ असे सांगितले. तर कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांनी बोलण्यास टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT