पुणे

गणेशोत्सवासाठी तीन हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

CD

पिंपरी, ता. १५ : गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने विशेष नियोजन केले आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी दोन हजार ७२७ पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच ५५० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय ‘एसआरपीएफ’च्या दोन प्लाटून, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), चार आरसीपी आणि १७ स्ट्रायकिंग पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा दोन हजार २५१ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशमूर्तींचे आगमन, प्रतिष्ठापना, दर्शनासाठी होणारी गर्दी तसेच विसर्जन मिरवणुका लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. गर्दीची ठिकाणे, प्रमुख चौक, संवेदनशील परिसर आणि विसर्जन मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

६४ पोलिस निरीक्षकांची जबाबदारी
सहपोलिस आयुक्त, एक अपर पोलिस आयुक्त, सहा पोलिस उपायुक्त आणि नऊ सहाय्यक पोलिस आयुक्त बंदोबस्तावर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत ६४ पोलिस निरीक्षक आणि २९१ सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा पोलिस उपनिरीक्षक बंदोबस्ताची प्रमुख जबाबदारी सांभाळणार आहेत. प्रत्यक्ष बंदोबस्तासाठी दोन हजार ३५५ पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.

होमगार्डही मदतीला
गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचा परिसर, प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे आणि विसर्जन मार्गांवर पोलिसांच्या मदतीसाठी ५५० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. ‘एसआरपीएफ’च्या दोन प्लाटूनसह बीडीडीएसची एक तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच चार आरसीपी आणि १७ स्ट्रायकिंग पथके बंदोबस्तात असतील. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रमांपासून विसर्जन मिरवणुकांपर्यंत कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT