पुणे

पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद वार्तापत्र

CD

पिंपोडे बुद्रुकमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी

रामराजे, नितीन पाटील गटाची आघाडी; बंडखोरीमुळे निकालाची धाकधूक

राहुल लेंभे ः सकाळ वृत्तसेवा

पिंपोडे बुद्रुक, ता. २३ ः कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांचा वारू रोखण्यासाठी विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार नितीन पाटील यांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे येथे ‘कमळ’ विरुद्ध ‘धनुष्यबाण-घड्याळ’ असा चुरशीचा सामना रंगणार आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने प्रचंड नाराजी पसरली असून, बंडखोरी शमवणे हे नेत्यांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.


जागावाटपासाठी रामराजे आणि नितीन पाटील यांना मोठा ‘काथ्याकूट’ करावा लागला. भाजपकडून जिल्हा परिषदेला अमित चव्हाण (दहिगाव), पिंपोडे बुद्रुक गणासाठी शर्वरी अमोल निकम (पिंपोडे बुद्रुक) आणि सोनके गणासाठी धनंजय धुमाळ (करंजखोप) यांना उमेदवारी मिळाली आहे, तर आघाडीकडून जिल्हा परिषदेसाठी सतीश धुमाळ (सोनके), रूपाली सुधीर साळुंखे (पिंपोडे बुद्रुक) आणि आकाश सोळसकर (सोळशी) संधी देण्यात आली आहे. आघाडीत जिल्हा परिषद व पिंपोडे बुद्रुक गण या दोन जागा राजे गटाला (शिवसेना) मिळाल्या आहेत, तर सोळशी गण राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे.

भाजपनेही जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षात दुफळी निर्माण झाली असून, योगेश कर्पे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. पिंपोडे बुद्रुक गावात ६,०२४ इतकी निर्णायक मतदारसंख्या असलेल्या दोन्ही प्रमुख गटांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याउलट सोनके गावाला सलग तिसऱ्यांदा आणि सतीश धुमाळ यांना दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने स्थानिकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने प्रस्थापितांचे टेन्शन वाढले आहे. त्यांच्यासोबत संजय साळुंखे, शहाजी भोईटे, सूर्यकांत निकम यांच्यासह अनेकांनी शड्डू ठोकल्याने मतांचे विभाजन कोणाला तारणार आणि कोणाला मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अर्जांच्या माघारीनंतरच खऱ्या अर्थाने लढतीचा पॅटर्न स्पष्ट होईल.
---------------------

विकासाचे प्रश्न अधांतरीच!
राजकीय गणिते आणि कुरघोड्यांच्या या खेळात सर्वसामान्य जनता मात्र बाजूला पडली आहे. कितीही निवडणुका झाल्या तरी गटातील खराब रस्ते, पाण्याचा प्रश्न आणि रखडलेलं औद्योगीकरण या समस्या कधी सुटणार? असा संतप्त सवाल मतदारांकडून विचारला जात आहे.
--------------
अपक्ष कुणाचा गेम करणार?
संजय साळुंखे, मंगेश धुमाळ, शहाजी भोईटे, सूर्यकांत निकम, उद्धव कर्णे, रेखा कोरडे, रणजितकुमार निकम, विलास जगताप यांच्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे. सगळ्यांच्याच नजरा अपक्षांकडे लागल्या आहेत. अर्ज माघारीवर सर्वांचे नशीब अवलंबून आहे. मोठे पक्ष आपापल्या ताकदीवर मैदानात उतरलेत; पण निकालाचा कौल अपक्ष ठरवतील, अशी सद्य:स्थिती आहे.

----------------

भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही गण कमळ या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत, तर आघाडीत जिल्हा परिषद गट व पिंपोडे बुद्रुक गण या दोन जागा राजे गटाला मिळाल्या असून, ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढतील, तर सोनके गण राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने तिथे घड्याळ चिन्हावर लढणार आहेत.

फोटो- अमित चव्हाण, सतीश धुमाळ, मंगेश धुमाळ, योगेश कर्पे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

कराड तालुका हादरला! चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार;संशयिताकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकी, चौघांवर गुन्हा..

Latest Marathi news Update : BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचं निधन

Padma Awards 2026 : पद्म पुरस्कार जाहीर: महिलांचा सन्मान, परदेशी नागरिकांचा गौरव; धर्मेंद्र, अच्युतानंदन यांना पद्मविभूषण

Republic Day 2026 : देशातील ४१ गावं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच साजरा करणार प्रजासत्ताक दिन, कारणही आहे खास

SCROLL FOR NEXT