पुणे

शहरात दहावीचा निकाल

CD

दहावीचे निकाल चांगले लावण्यात शाळांना यश

पिंपरी, ता.९ ः शहरातील विविध शाळांनी दहावीचा निकाल चांगला आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथील इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९८.७३ टक्के लागला. विद्यालयातील तनिष्का दौंडकर हिने ९१.४० टक्के, प्रिया शिंदे हिने ९१.०० टक्के, संस्कृती मोरे हिने ९०.८० टक्के गुण मिळविले. या उल्लेखनीय यशाबद्दल विनायकराव भोंगळे, कविता भोंगळे-पाटील, शैलेंद्रसिंग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मॉडर्न हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. मराठी माध्यमाचे श्रुती डौले (९८.०२), संस्कार पाटील (९७.४७), सर्वेश कस्तुरे (९६.०६) तर इंग्रजी माध्यमाचे सई केंदे (९५ टक्के), तनिष्का नाईकवडे (९४) श्रीश्लेषा जाधव (९३ टक्के) असे गुण प्राप्त केले.
निगडी प्राधिकरण येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या समृद्धी भगत (९६.४०), प्रज्ञा ओवाळ (९५.४०), गार्गी खानझोडे (९०.२०) गुण मिळवले. विद्यालयाचा निकाल ९५.५१ टक्के लागला.
एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल यमुनानगर निगडी येथील आदित्य खैरे (९५ टक्के) मिळवले आहेत. सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेचा निकाल ९९.६२ टक्के निकाल लागला. श्रुती घोडके (९८.६०), किरण खोसे (९५.६०), सानवी लोखंडे (९५.२०). संस्कृत विषयांमध्ये प्रशालेच्या घोडके, खोसे, लोखंडे, श्रेया दगडे यांना १०० पैकी ९९ गुण मिळविले.
चिंचवड येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयाचा निकाल ९८.२० टक्के लागला. दुर्वेश सोनवणे (९५.८०), आयुष महाडिक (९४.८०), समीर शेख व सोहम राक्षे (९३.४०) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
दिघी येथील मंजुरीबाई माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.३३ टक्के निकाल लागला आहे. नैतिक गोबे (८४ टक्के), प्रतिक्षा अहिरे (८१), कुणाल तिटकरे (७८) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील निकाल १०० टक्के लागला. कुसुम कोटकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील पहिले १० विद्यार्थी हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
आचार्य श्री आनंद ऋषी इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९८.८६ टक्के लागला. श्रेय कस्तुरे याने ९४.६० टक्के गुण मिळविले. प्राचार्य सीमा लिंभोरे, दिलशाद पठाण यांनी अभिनंदन केले.
निगडी येथील श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९८.०९ टक्के लागला. कार्तिक कुटे ८९.६० टक्के, ईश्वरी तावरे ८८.२० टक्के, अनिकेत गायकवाड ८६.८० टक्के मिळवले आहे. विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत मारकड, हितेंद्र लोखंडे, पल्लवी बापूले व धनश्री कांबळे यांनी अभिनंदन केले.
श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्‍यमिक विद्यालय पुनावळेचा दहावीचा निकाल ८७.५० टक्के लागला. गिरमाजी पुयड (८५.२० टक्के), धनंजय पारडे (८२.८०), अमृता देनकुळे (८१.४०), कल्पना भासे (८०.२०) मिळवले आहे.
मोहन नगर-चिंचवड श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा निकाल या वर्षी ९९.६१ टक्के लागला. तब्बल २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले. वैष्णवी जाधव (९६.२० टक्के), केदार सूरज (९६ टक्के), हर्षल आवटे (९५), श्रावणी घाडगे (९४.८०), आयुष आगरकर (९४.६०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT