पुणे

मारहाण व दगडफेकप्रकरणी चौघांवर गुन्हा

CD

पिंपरी : मारहाण, धक्काबुक्की करीत दगडफेक केल्याने दोन वाहनांच्या काचा फुटून दोघेजण जखमी झाले. ही घटना रहाटणी येथे घडली. या प्रकरणी नीरजकुमार योगेंद्र शर्मा (रा. थेरगाव, मूळ- बिहार) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतीक बाबर व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचे भाऊ दुकान बंद करून घरी जात असताना आरोपींनी फिर्यादीच्या भावाला मारहाण व शिवीगाळ केली. याबाबत विचारणा करीत असताना त्यांनी फिर्यादीशी वाद घातला त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच पोलिसात तक्रार केल्यास मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी मारलेले दगड शेजारच्या दुकानातील क्रिश बघेल व धीरज बघेल यांना लागल्याने ते जखमी झाले. या दगडफेकीत फिर्यादी व आणखी एकाच्या टेम्पोची काच फुटली.

बनावट कागदपत्रांच्या आधारे ९९ लाखांची फसवणूक
पिंपरी : कंपनीचे ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली एका पतसंस्थेत एक कोटी रुपयांची ठेव ठेवण्यास सांगून बनावट कागदपत्रांच्या आधारे ९९ लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. हा प्रकार पिंपळे गुरव येथील विनायक नगर येथे घडला. या प्रकरणी संतोष अंबादास काटे (रा. विनायक नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल बाळकृष्ण कौलगे (रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), दीपक बिभीषण उपासे (रा. पंढरपूर, सोलापूर), गुरुप्रसाद ब्रम्हदेव शुक्ला, वसिम खान आणि राज बहादूर पाल (सर्व रा. श्रीनगर, ठाणे पश्चिम) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रा.लि. कंपनीचे ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. ट्रान्स्पोर्टच्या कामासाठी कंपनीचे डिपॉझिट भरण्यासाठी सिद्धेश सहकारी पतसंस्था ठाणे येथे एक कोटी रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर कोणतेही कॉन्ट्रॅक्ट न देता आरोपींनी पतसंस्थेचे अधिकारी गुरुप्रसाद शुक्ला, वसिम खान व राज पाल यांना हाताशी धरून परस्पर बनावट पावत्या, कागदपत्रे व बनावट आधारकार्ड बनवून मूळ ठेव पावती फिर्यादीकडे असतानाच परस्पर रक्कम काढून ९९ लाख रुपयांची फसवणूक केली.

तक्रारीच्या रागातून मारहाण; कुटुंबाला मारण्याची धमकी
पिंपरी : पूर्वी केलेल्या तक्रारीच्या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करीत मारहाण व धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या कुटुंबाला बांधून मारण्याची धमकी दिली. ही घटना हिंजवडी फेज एक येथे घडली. या प्रकरणी चंद्रशेखर नागाभूषण रेड्डी (रा. हिंजवडी फेज एक, मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुब्रत मिश्रा (रा. हिंजवडी फेज एक, मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध यापूर्वी केलेल्या तक्रारीच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करून अंगावर धावून येत हाताने मारहाण व धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत फिर्यादीचा उजवा हाताचा खांदा निखळला.

पैसे भरण्याच्या बहाण्याने महिलेला ४२ हजारांना गंडा
पिंपरी : बँकेत आलेल्या एका महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना खात्यात पैसे जमा करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने ४२ हजार रुपये लांबवले. ही घटना निगडी येथे युनियन बँकेत घडली. या प्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला निगडी येथील युनियन बँकेत गेल्या. त्यावेळी तिथे असलेल्या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे आरोपींनी भासवून ४२ हजार रुपये लांबवले.

सिमकार्ड बंद करून ३३ लाख ७१ हजारांची फसवणूक
पिंपरी : कंपनीच्या मेल आयडीशी साधर्म्य असणारा बनावट मेल आयडी वापरून नवीन सिमकार्ड मिळवत ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे ३३ लाख ७१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना निगडी, प्राधिकरण येथे घडली. या प्रकरणी निगडी प्राधिकरण येथील ५१ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या कंपनीच्या ई-मेल आयडीसारख्या दिसणाऱ्या मेलवरून एका टेलिकॉम कंपनीला ई-मेल करण्यात आला. याद्वारे बँक खात्याशी लिंक असलेले सिमकार्ड बंद करून त्याच क्रमांकाचे नवीन सिमकार्ड मिळवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी ऑनलाइन नेट बँकिंगचा वापर करून एकूण ३३ लाख ७१ हजार रुपये ऑनलाइन लंपास केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

Samruddhi Magdum Death : लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरला! आठ महिन्यांच्या गर्भवतीचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्रावामुळे दुर्दैवी मृत्यू, मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rising Star Asia Cup: रिंकू सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार! पाटीदारची अचानक माघार, सध्या निवड न करण्याची BCCI कडे विनंती

Ganga returns to Haridwar Har Ki Pauri : १८ दिवसांनंतर अखेर 'तिचे' पुनरागमन! ऐन दिवाळीच्या दिवशी वाहू लागला खळाळता प्रवाह; घाटांवर भाविकांचा महापूर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

SCROLL FOR NEXT