पिंपरी, ता. १८ : घरफोडी करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. या आरोपीकडून चार लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उत्तम गाढवे (रा. माणिकनगर, पोते वस्ती, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना शंभर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता हा गुन्हा गाढवे याने केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बोपखेल फाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरफोडीतील चार लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.