पुणे

ग्राहकांचे दोन लाख ९१ हजार शोरूमच्या खात्यावर न भरता फसवणूक

CD

पिंपरी : गाड्या बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून रोख आणि ऑनलाइन पैसे स्वीकारून शोरूमच्या खात्यावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना किवळे येथील एका शोरूमच्या आऊटलेटमध्ये घडली. या प्रकरणी ५५ वर्षीय महिला सेल्स मॅनेजर (चिंचवड गाव) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोर सुधाकर बागडे (रा. संगमवाडी, शिवाजीनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा या शोरूमच्या किवळे आऊटलेटमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कामास होता. त्याने ग्राहकांकडून गाड्या बुकिंगच्या नावाखाली रोख व ऑनलाइन पद्धतीने एकूण दोन लाख ९१ हजार ८०० रुपये स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर स्वीकारले. ही रक्कम शोरूमच्या खात्यावर जमा न करता त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ग्राहक आणि शोरूमची फसवणूक केली.

तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा
पिंपरी : काम असल्याचे सांगत बोलावून एका तरुणाला शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. ही घटना चिंचवडमधील अजंठानगर येथे घडली. या प्रकरणी सागर भारत गायकवाड (रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनील सुदाम करे (रा. मोरे वस्ती, चिखली) आणि अक्षय गायकवाड (रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा मित्र असलेला आरोपी सुनील करे याने फिर्यादीला ‘तुझ्याकडे काम आहे’ असे सांगून बोलावले आणि शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी अक्षय गायकवाड याने लाकडी दांडका सुनीलकडे दिला. सुनीलने त्या दांडक्याने फिर्यादीच्या दोन्ही पायांवर मारहाण करून गंभीर दुखापत केली.

रुग्णवाहिकेच्या धडकेत सायकलस्वार जखमी
पिंपरी : कामावर जाणाऱ्या एका सायकलस्वाराला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. यात सायकलस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना चिखली स्पाईन रोडवरील जाधव सरकार चौक येथे घडली. या प्रकरणी लक्ष्मण नथुजी साह (रा. जाधववाडी, चिखली, मूळ- बिहार) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या सायकलवरून कंपनीत कामावर जात होते. ते जाधव सरकार चौकात आले असता समोरून आलेल्या एका भरधाव रुग्णवाहिका चालकाने सायकलला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.

अमली पदार्थ बाळगणारा अटकेत
पिंपरी : अफूच्या सुकवलेल्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) हा अमली पदार्थ बेकायदारित्या जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई ताथवडे येथे करण्यात आली. रेवतराम घेवरराम चौधरी (रा. ताथवडे, मूळ- राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. डांगे चौकाकडून रावेतकडे जाणाऱ्या मार्गावर आरोपी अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या ताब्यातील दुचाकीची झडती घेतली असता, त्याच्याकडे १३ हजार ३०५ रुपये किमतीचा पॉपी स्ट्रॉ हा अमली पदार्थ आढळला. पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

हत्यार बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या तलवार आणि कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई विद्यानगर येथील हनुमान मंदिरासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली. प्रेम कृष्णा मोरे (रा. निगडी प्राधिकरण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला ही हत्यारे पुरवणारे रोहन माने (रा. विद्यानगर, चिंचवड) आणि रिहान शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम मोरे याला तलवार आणि कोयता ही हत्यारे रोहन माने आणि रिहान शेख यांनी पुरवली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT