पिंपरी, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उद्योगनगरी पिंपरी चिंचवडचा ९७.३१ टक्के इतका निकाल लागला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्या टक्क्याने कमी आहे. दरम्यान, गुणवत्तेतही मुलींचे वर्चस्व कायम राहिले असून हे प्रमाण ९८.१८ टक्के, तर तुलनेत मुलांच्या निकालाचे प्रमाण ९६.५७ टक्के नोंदवले गेले. त्यामुळे आणखी एका वर्षी मुलींनी गुणवत्तेत आघाडी घेतल्याचे दिसून आले.
दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.८) सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाइन जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांची धाकधूक संपली आणि ‘‘हिप हिप हुर्रे...’’ ‘‘पास झालो...’’ असा आवाज आज सर्वत्र घुमला. दरम्यान, शहरातील २१५ पैकी तब्बल ९८ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाईल, लॅपटॉपवर निकाल पाहिला. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशांसाठी खास शाळांमध्ये व्यवस्था केली होती.
पुनर्परीक्षार्थींच्या निकालात घसरण
इयत्ता दहावी परीक्षेचा पुनर्परीक्षार्थींचा (रिपीटर) ६९.३२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत १०.४६ टक्क्यांत घसरण झाली आहे. गेल्यावर्षी ७९.७८ निकाल लागला होता. ६६.८३ टक्के मुले, तर ७२.६० टक्के मुलींनी बाजी मारली आहे. शहरात यावर्षी १,४०२ पुनर्परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यात मुले ७९५ आणि ६०७ मुलींचा समावेश होता. त्यापैकी ७७२ मुले आणि ५८४ अशा १ हजार ३५६ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९४० उत्तीर्ण झाले. यात ५१६ मुले आणि ४२४ मुली उत्तीर्ण झाल्या. ४१६ पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
सर्वांत कमी निकाल
महापालिकेच्या रुपीनगर- निगडी माध्यमिक विद्यालयाचा सर्वात कमी ६२.९२ टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातील ८९ विद्यार्थ्यांपैकी ५६ उत्तीर्ण झाले, तर ३३ अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी विशेष प्राविण्यासह १२, प्रथम श्रेणी २० आणि द्वितीय श्रेणी १९ व ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
आकडे बोलतात...
तपशील ः शाळा ः मुले ः मुली ः एकूण
नोंदणी ः २१५ ः १०,३०१ ः ९,६६२ ः १९,९६३
परीक्षार्थी ः २१५ ः १०,२८२ ः ९,६३० ः १९, ९१२
उत्तीर्ण ः २१५ ः ९,९३० ः ९,४४८ ः १९,३७८
९८ शाळांचा शंभर टक्के निकाल
गुणवंतांचे प्रमाण (विद्यार्थी संख्या)
- विशेष प्रावीण्यासह ः ७,८८०
- प्रथम श्रेणी : ६,४९०
- द्वितीय श्रेणी : ३,८६५
- उत्तीर्ण श्रेणी : १,१४३
- अनुत्तीर्ण विद्यार्थी : ५३४
उत्तीर्णतेचे प्रमाण
मुले - ९६.५७
मुली - ९८.११
पुनर्परीक्षार्थी - ६९.३२
एकूण -९७.३१
मागील सहा वर्षांतील उत्तीर्णतेचे प्रमाण
वर्ष - टक्के
२०२०-९४.११
२०२१-९९.९२
२०२२-९७.७२
२०२४ -९६.७२
२०२५ - ९७.९७
-२०२६ -९७.३१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.