पुणे

दाखल गुन्ह्यांची हजारी पार

CD

पिंपरी, ता. ७ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील २५ पैकी तीन पोलिस ठाण्यांत या चालू वर्षात दाखल गुन्ह्यांच्या आकड्याने हजारी ओलांडली आहे. तर सात ठाण्यांत आठशेचा आकडा ओलांडला आहे. या गुन्ह्यांमध्ये फसवणूक, वाहन चोरी या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. वाढते दाखल गुन्हे चिंताजनक बाब ठरत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर व ग्रामीण भागाचा समावेश असून, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, मोठ्या गृहप्रकल्पांबरोबरच कामगार वस्त्यांची संख्याही वाढत आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक शहरात स्थायिक होत आहेत. तर दुसरीकडे वेगवेगळ्या कारणावरून गुन्हे वाढत असून, गुन्ह्यांचे स्वरूपही वेगवेगळे असल्याचे दिसून येते.

भौगोलिक स्थितीचा परिणाम
काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या परिसरांचा समावेश आहे. एका बाजूला मोठ्या गृहसंकुलांची निर्मिती होत असताना दुसऱ्या बाजूला गावठाण, औद्योगिक पट्टा आणि विस्तारित वसाहती आहेत. काही भागांत मुख्य रस्ते, महामार्ग, अंतर्गत रस्ते आणि निर्जन परिसर आहेत.

गुन्हे नोंदविण्याचे प्रमाणही महत्त्वाचे
एखाद्या पोलिस ठाण्यात एक हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले म्हणजे त्या परिसरातच सर्वाधिक गुन्हेगारी आहे, असा सरसकट निष्कर्ष काढता येत नाही. नागरिकांनी तक्रार देण्याचे वाढलेले प्रमाण, ऑनलाइन तक्रार व्यवस्था, सायबर गुन्ह्यांची नोंद आणि पोलिसांकडून तक्रारींची गांभीर्याने घेतली जाणारी दखल यांचाही आकडेवारीवर परिणाम होतो, असेही पोलिसांकडून सांगितले जाते.

या उपाययोजना आवश्यक
- गुन्ह्यांची संख्या अधिक असलेल्या पोलिस ठाण्यांत मनुष्यबळ वाढविणे
- नियमित गस्त घालणे
- सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे मजबूत करणे

पोलिस ठाण्यांचे विभाजन
भौगोलिक हद्द मोठी असलेल्या ठाण्यांचे मागील काही वर्षांत विभाजन केले आहे. चाकण, महाळुंगे एमआयडीसी, हिंजवडी यासह इतर ठाण्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच पिंपळे सौदागर, मोशी, जांबे, देहूगाव, पिरंगुट या नवीन ठाण्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.

चालू वर्षातील स्थिती
पोलिस ठाणे ः दाखल गुन्हे
निगडी ः १००६
पिंपरी ः १००३
चाकण उत्तर ः १०२४
तळेगाव दाभाडे ः ५०१
चाकण दक्षिण ः ३२९
चिखली ः ९०६
आळंदी ः ६२०
भोसरी ः ८८४
वाकड ः ८००
देहूरोड ः ४५५
भोसरी ः ८७१
दिघी ः ७९६
एमआयडीसी भोसरी ः ८८४
चिंचवड ः ६७६
दक्षिण महाळुंगे ः ८९३
उत्तर महाळुंगे ः २११
तळेगाव एमआयडीसी ः ३८८
काळेवाडी ः ६७९
हिंजवडी ः ९७५
दापोडी ः ४०६
सांगवी ः ७३५
बावधन ः ६७०
दिघी ः ७८४
संत तुकारामनगर ः ५७८
रावेत ः ५३३
शिरगाव ः ३२८
----------------
पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करून घेत असल्याने दाखल गुन्ह्यांची संख्या अधिक दिसते. यासह लोकसंख्या वाढली असून, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेही घडत आहेत. काही ठाण्यांच्या भौगोलिक हद्दीही मोठ्या आहेत.
- बसवराज तेली, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exams Uncertainty News : एमपीएससीच्या अनिश्चित कारभाराने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात!

Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराची सुट्टी असतानाही बाजार का उघडतो? काय आहे मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा?

IND vs NZ 2nd ODI Live : आयना का बायना, जिंकल्याशिवाय जाईना... भारताचा नाट्यमय विजय, पावसाने वाचवले; मालिकेत आघाडी, कोण ठरला मॅच विनर?

भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

Latest Marathi News Live Update: पुण्यात कात्रज कोंढवा काकडे वस्तीमध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर, फुटपाथवर अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT