पुणे

‘पिंपरी-चिंचवड महोत्सवा’ची दिमाखात सुरुवात!

CD

पिंपरी, ता.१८ ः चिंचवडचे ग्रामदैवत आणि श्रीमंत मूर्तिमंत महासाधू मोरया गोसावी मंदिरापासून पारंपरिक संस्कृतीच्या जयघोषात ‘पिंपरी-चिंचवड महोत्सवा’च्या मिरवणुकीला सुरुवात झाली. भव्य पालखी दिंडी आणि सांस्कृतिक मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशा पथकांनी सादरीकरण करत संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह भरला. हातातील लेझीमचा खळाळणारा आवाज आणि संबळाच्या कडकडाटावर तरुणाईने धरलेला ठेका मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला. पारंपरिक वेशभूषेतील भक्ती ज्ञानराज गुरुकुल शिक्षण संस्था आळंदीच्या बालवारकऱ्यांनी पखवाज, टाळमृदुंग, वीणा वादनाने उपस्थितांची मने जिंकली. या मिरवणुकीत प्रसिद्ध कलाकार फिरोज मुजावर यांच्या लावणी सादरीकरणाने रंगत आणखी वाढवली. या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी चिंचवडकर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि सांस्कृतिक घोषणांनी परिसर गुंजत होता. मंदिराच्या परिसरातून निघालेल्या या दिंडीचे स्वागत नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून केले. मोरया गोसावी मंदिरापासून मार्गस्थ झालेल्या या मुख्य उद्घाटन मिरवणुकीचा समारोप प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरात झाला. या महोत्सवामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीन दिवसीय ‘पिंपरी चिंचवड महोत्सव’ला सुरूवात झाली आहे. या भव्य मिरवणुकीने महोत्सवाची उंची पहिल्याच दिवशी वाढवली आहे. पुढील तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला, संगीत, नाट्य आणि खवय्यांसाठी खाद्यसंस्कृतीची मोठी पर्वणी असणार आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांची पर्यावरण दिंडी
या मिरवणुकीत भोईरनगर मधील जयवंत माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात ‘स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर’, ‘वृक्षतोड करू नका भविष्य धोक्यात टाकू नका ’, ‘आरोग्य आणि स्वच्छता हीच बाप्पाची खरी भक्ती’, असे संदेश देणारे आकर्षक फलक घेऊन पर्यावरणाचा संदेश दिला.

नाद ढोल-ताशांचा
या मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या आरंभ ढोल पथक, शिवाज्ञा ढोल, लहुजी ग्रुपचा ताशा आणि मल्‍हार ग्रुप संबळ आणि येडेश्‍वरी ग्रुपच्या हलगी पथकांनी वातावरणात एक वेगळाच जोश निर्माण केला. शेकडो वादकांच्या लयबद्ध हातांनी पडणाऱ्या थापांनी आणि झांजांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांचा लेझीम आणि ढोलचा थरार
आकुर्डीतील सरस्वती माध्यमिक विद्यालय, पीएमश्री थेरगाव माध्यमिक विद्यालय, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयामधील पारंपरिक वेशभूषेत आलेल्या शालेय मुला-मुलींनी हातातील लेझीमचा खळाळणारा आवाज आणि लयबद्ध कसरती सादर करत विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत एक वेगळीच ऊर्जा भरली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषात निघालेल्या या मिरवणुकीत पारंपरिक पोशाखातील लहान मुलींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT