Pimpri-Chinchwad 
पुणे

संधींचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडला पसंती

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने शहराचे सर्वेक्षण करून नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडकडे अनेक जण ‘संधीचे शहर’ म्हणून पाहात असल्याचे आढळून आले आहे; तसेच ‘स्मार्ट व स्वच्छ शहर’ म्हणून बहुतांश नागरिकांनी पसंती दिली आहे. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला आहे. त्यानुसार महापालिकेचे नियोजन सुरू असून, आराखडा आखला आहे. त्याअंतर्गत शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची मतं जाणून घेतली आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून २५ टक्के नागरिकांनी पिंपरीगाव व परिसराला महत्त्व दिले आहे. शहराच्या वैभवात भर घालणारी काही ठिकाणी महापालिकेने विकसित केली आहेत. त्यात काही ऐतिहासिक, धार्मिक असून काही उद्याने व पर्यटन केंद्र आहेत. त्यातील निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूह, दुर्गादेवी टेकडी, महापालिका संगीत अकादमी, चिंचवडगावातील चापेकर चौक, मोरया गोसावी समाधी मंदिर, पुणे-मुंबई महामार्ग, ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्क, बर्ड व्हॅली, पवना नदी, इंडस्ट्रिअल हब आणि नाशिक फाटा दुमजली उड्डाण पूल या स्थळांपैकी भक्ती-शक्ती शिल्प समूहाचा १६ टक्के नागरिकांनी अभिमानास्पद असा उल्लेख केला आहे. 

स्मार्ट व स्वच्छ शहर
शहराबद्दल नागरिकांचे मत जाणून घेताना ‘स्मार्ट आणि नियोजित शहर’ म्हणून अधिक पसंती दिली आहे. साधारणतः ३५ टक्के नागरिकांनी स्मार्ट आणि स्वच्छ शहर अशा शब्दांत गौरव केला आहे. काही गावांचे मिळून अल्पावधीत नावारूपाला आलेल्या शहराच्या नियोजित विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळेच स्मार्ट शहर, स्वच्छ शहर व हरित शहरासाठी आवश्‍यक उपक्रम अधिक वेगाने राबविणे शक्‍य होत असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे. 

भविष्यातील अपेक्षा
औद्योगिकनगरी अशी शहराची ओळख आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली, मोशी, तळवडे आदी भागात औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती झालेली आहे. हिंजवडी आयटी पार्कलगतच्या वाकड भागाचाही यात समावेश आहे. त्यामुळे शहराचे औद्योगीकरण आणि होणार विकास पाहता नागरिकांनी ‘संधीचे शहर’ म्हणून शहराचे वर्णन केले आहे. त्या खालोखाल ‘डिजिटल सिटी’ म्हणून पसंती दर्शवली आहे.

नागरिकांच्या अपेक्षा
ध्येय    टक्केवारी

संधीचे शहर    १८.३
स्मार्ट सिटी    १७.७
क्‍लीन सिटी    १७.३
हरित शहर    १३.४
डिजिटल सिटी    १२.३

नद्यांची स्वच्छता व प्रदूषणमुक्त शहर करायला हवे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास अतिरिक्त वाहतुकीचा ताण कमी होईल. ग्रीन सिटी होण्यासाठी वृक्षरोपणावर भर दिला पाहिजे. दुर्गा टेकडीसारखे उपक्रम आरोग्यासाठी लाभदायी आहेत, असे उपक्रम इतरत्र राबवावेत.
- डॉ. अभय तांबिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT